30 वा डॉ. वसंतराव देशपांडे स्मारक संगीत महोत्सवाचा समारोप

नागपूर  :  “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत डॉ. वसंतराव देशपांडे(Dr. Vasantrao Deshpande) यांच्या स्मरणार्थ, दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्र(South Central Division Cultural Centre), नागपूर दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन करते.  30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता “30 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सव” आयोजन करण्यात आले होते.  यात  6010 हून अधिक दर्शकांनी यूट्यूब लाईव्हद्वारे तीन दिवसांच्या या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

संपदा-माने

रविवारी 1 ऑगस्ट 2021 रोजी संगीताचा कार्यक्रम श्रीमती संपदा माने (Sampada Mane)आणि सहकाऱ्यांनी  ‘मैफील नाट्यसंगीताची’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित बाळ गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडीत दिनानाथ मंगेशकर यांच्या नाट्यगीतांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता आला…

या सादरीकरणात गायिका  संपदा माने आणि निमिष कैकाडी यांचा समावेश होता. प्रसाद पाध्ये यांनी तबल्यावर साथ दिली. निरंजन लेले यांनी ऑर्गन वाजवून साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक यांनी केले.

तीन दिवसीय भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले, नागपूरकर कलारसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेत कलाकारांना प्रोत्साहन दिले, केंद्र संचालकाने त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Social Media