गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाच्या(Gosikhurd project) पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणाचे 33 ही गेट उघडण्यात आले असून 30 गेट हे अर्ध्या मीटरने तर 3 गेट 1 मीटर ने उघडण्यात आले आहेत. या मधून सध्या 3929. 127 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळ पासून टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरवात झाली होती दुपारी 3 वाजेपर्यंत 33 ही गेट अर्ध्या मीटर ने उघडण्यात येणार होते मात्र धरणात वाढणाऱ्या पाण्यामुळे दुपारी 1 वाजला 33 गेट उघडण्यात आले आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 तारखेला जिख्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे.

गोसे धरणाची सध्याची पाणी पातळी 243.17 मीटर एवढी

The current water level of Gose dam is 243.17 metres

गोसे धरणाची सध्याची पाणी पातळी 243.17 मीटर एवढी आहे. पाणी साठा 41.80% आहे. ही पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी 23 तारखेला सकाळपासूनच टप्याटप्याने गेट उघडण्यास सुरवात करण्यात आली. सकाळी 3 गेट उघडण्यात आले. नंतर 5 गेट उघडण्यात आले, 10 वाजेपर्यंत 19 गेट उघडण्यात आले होते. तर 12. 30 ला 31 गेट उघडण्यात आले या मधून 3390.5 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र धरणात वाढत असलेला पाणी बघताच केवळ 15 मिनिटातच धरणाचे 33 ही दारे उघडण्यात आली. या 33 पैकी 30 दारे ही अर्धा मीटर ने तर 3 गेट 1 मीटर ने उघडण्यात आले असून या मधून 3929. 127 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच विद्युत गृहातून160 आणि उजव्या कालव्यातून 24 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग होत असून एकूण 4113.127 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी पात्राच्या जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

33 gates of the dam have been opened to maintain the water level of the dam due to continuous rains in the catchment area of the Gosikhurd project and an increase in water inflow and 30 gates have been opened by half a meter and 3 gates by 1 meter. Out of this, 3929 currently. Water is being discharged by 127 cumecs. The gate had started opening in a phased manner from morning till 3 pm. 33 gates were to be opened by half a meter, but due to rising water in the dam, 33 gates have been opened at 1 pm.


हे संकट मोठे आहे, आभाळच फाटले आहे : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार –

हे संकट मोठे आहे, आभाळच फाटले आहे : आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

Social Media