तिथीनुसार 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा

 

 

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील असलेल्या किल्ले रायगड गडावर आज शासनाचे सर्व नियम पाळून तिथीनुसार 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला.

महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व इतर अनेक मान्यवर , शिवभक्त यावेळी उपस्थित होते. हिंदू धर्म रीतीप्रमाने यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तिथीनुसार गेली अनेक वर्ष किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो.

” आजच्या हिंदू तिथी प्रमाणे साजरा होत असलेल्या शिव राज्याभिषेक दिनास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी ५ लाख रुपयांचा निधी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीकडे सुपूर्द केला आहे. तसेच दरवर्षी तशी रक्कम देणार असून त्यांना हिंदू तिथीप्रमाणे होणारा सोहळा बघायचा आहे व रायगडावर येणार असल्याचे आहे. ” असे यावेळी शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

कोकणकडा मित्रमंडळ, महाड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद , रायगड यांच्या संयुक्त सहकार्याने 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा ५० जणांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमानुसारच हा सोहळा साजरा करण्यात आला.

Social Media