मसुरी, Uttarakhand Tourism : कोव्हिड मार्गदर्शक तत्वे आणि निर्बंधांमध्ये सूट मिळाल्यानंतर मसूरी, धनोल्टी, कॅम्पटीफाल मध्ये येण्यासाठी पर्यटक सतत हॉटेलांशी फोनवरून संपर्क साधत आहेत. हॉटेलांमध्ये खोल्यांसाठी बुकिंग देखील सुरू झाली आहे. अपेक्षा आहे की, जूनच्या उर्वरित राहिलेल्या दोन आठवड्यांमध्ये मोठ्या संख्यने पर्यटक(tourists) मसूरीला भेट देतील, परंतु सर्वात मोठी समस्या अशी आहे की, आतापर्यंत सर्व पर्यटन स्थळे बंद होती, त्यामुळे पर्यटक मुक्तपणे फिरू शकत नाहीत.
सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र मानसरोवर तलाव
उत्तराखंड(Uttarakhand) हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप साहनी यांचे म्हणणे आहे की, शहरातील जवळपास ६० टक्के हॉटेल्स उघडले आहे. या वीकेंडसाठी गुरूवारपर्यंत ४० टक्के बुकिंग झाली आहे. बाजारपेठ अद्याप पूर्णपणे उघडलेली नाही. रेस्टॉरंट आणि ढाब्यावर बसून, पर्यटकांना जेवन दिले जात नाही, पर्यटन स्थळे देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत पर्यटक थोडे संभ्रमात आहेत. पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांची मागणी आहे की सहलीची ठिकाणे उघडली जावीत, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमघ्ये बसून जेवण्याची परवानगी दिली जावी आणि बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू करावी.
ताजनगरीच्या पर्यटन संस्थांनी १६ जूनपासून स्मारके उघडण्याच्या निर्णयाचे केले कौतुक!
मसूरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राकेश नारायण माथुर आणि सरचिटणीस संजय अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, १९ जूनपासून सुरू होणाऱ्या विकेंडसाठी २० ते ४० टक्क्यांपर्यंत बुकिंग झाली आहे. परंतु बाजारपेठ बंद असल्याने पर्यटक येण्यास संकोच करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या पर्यटक कुटुंबासमवेत येत नाहीत. त्यांनी शहरातील किमान तीन ठिकाणी रॅपिड अँटीजेन चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, येणारे दोन आठवडे पर्यटनासाठी खूप महत्वाचे ठरतील.
A large number of tourists are expected to arrive in Mussoorie this weekend, 40 percent booking has been done in hotels.
स्मारकांवरील पर्यटकांची तुलनात्मक स्थिती –
आग्र्यातील पर्यटन व्यवसाय दोन महिन्यात पुन्हा रूळावर येण्याची शक्यता….