पेण तालुक्यात असलेल्या हनुमान व्यायाम शाळेत 5 तासांत 5 हजार 555 सूर्यनमस्कार काढण्याचा विक्रम

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या हनुमान व्यायाम शाळेत 5 तासांत 5 हजार 555 सूर्यनमस्कार काढण्याचा विक्रम अजय पाटील या युवकाने केला.

आताच्या युगात बाॅडी फिटनेस ठेवण्याची स्पर्धा तरुण तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याने पेण तालुक्यात अनेक व्यायामशाळा सुरू झाल्या आहेत. पेण शहरातील हनुमान व्यायाम शाळा व श्री फिटनेस सेंटर पेण यांच्या वतीने आज सकाळी 7.30 वाजता हिंदू पुश्यप (सुर्यनमस्कार) काढण्यासाठी जवळपास पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बळवली येथील अजय कमलाकर पाटील यांनी न थांबता लगातार 5 तासांत 5 हजार 555 हिंदू पुश्यप (सुर्यनमस्कार) काढण्याचा विक्रम केला आहे.

त्याच्या या विक्रमाचा आनंद पाहून हनुमान व्यायाम शाळेचे सदस्य डॉ.अशोक भोईर यांनी त्याला 5 हजार 555 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पेण तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे तसेच न्यू यंग संघ पिंपळपाडा अध्यक्ष दत्ता पाटील यांनी चषक देऊन त्यांचा सन्मान केला.

यावेळी बोलतांना डॉ.अशोक भोईर म्हणाले की ” अजय पाटील यांनी दाखविलेली जिद्द त्याला प्रेरणादायी ठरली असून आतापर्यंत या व्यायाम शाळेत 1हजार 600 सुर्यनमस्कार काढण्याचा विक्रम होता मात्र अजय पाटील यांनी 5 हजार 555 सुर्यनमस्कार काढून नविन विक्रम केला” असल्याचे त्यांनी सांगितले.

” तर मला व्यायामाचे वेड असल्याने मिळेल त्या वेळेत आपला शरीर फिट ठेवण्यासाठी मी व्यायाम करीत असतो मनात ठरविले होते की आपण एकदा तरी मोठी संख्या गाठायची ती आज पुर्ण झाली असल्याचा आनंद वाटत आहे ” असे अजय पाटील यांनी सांगितले.

यावेळी हनुमान व्यायाम शाळा व श्री फिटनेस सेंटरचे ट्रेनर राजेश अनगत, दशरथ भोपतराव महाराज, पेण नगरपालिका कर्मचारी दिपक सोनावणे, सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे आदिंसह पेण तालुक्यातील तरुण मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

Tag-Hanuman Gymnasium in Pen taluka holds 5,555 sunscreens in 5 hours

Social Media