मुंबई : देशात लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पूर्ण(100 crore vaccination phase completed in the country) होत आहे.महाराष्ट्राचा देखील त्यात मोठा वाटा आहे.राज्यातील ९.५ कोटी जनतेचे लसीकरण झाले आहे.त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७० टक्के जनतेचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. मात्र उर्वरित ३० % लसीकरण हे आव्हानात्मक काम असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात २ कोटी ९० लाख म्हणजे ३५ टक्के जनतेचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.दोन्ही डोस पूर्ण करण्याच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.राज्यातील सर्व महाविदयालयांत विदयार्थ्यांसाठी मिशन युवा कोविड लसीकरण मोहिम २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचेही राजेश टोपे आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीसांगितले.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील ९.५ कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले आहे.दोन्ही डोसच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे.एकूण लसीकरणातही पहिला क्रमांक आपण मिळविला असता पण उत्तरप्रदेशला जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात आल्याने त्यांनी तो क्रमांक मिळविला आहे.मात्र केंद्र सरकारकडून आता योग्य प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात येत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
तरूण पिढी ही बाहेर फिरत असते.त्यामुळे त्यांच्या मार्फत संसर्गाचा धोका अधिक असतो.त्यामुळे महाविदयालयातील तरूणांचे लसीकरण विशेष मोहिम घेउन करण्यात येणार आहे.२५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येईल.या माध्यमातून ४० लाख महाविदयालयीन विदयार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयास असणार आहे असेही टोपे म्हणाले.
नवीन व्हेरिअंट अदयाप तरी नाही
राज्यात आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे.निर्बंधही जवळपास शिथिलच झाले आहेत.लोक मोठया प्रमाणात आता बाहेर पडायला सुरूवात झाली आहे.अशा परिस्थितीत लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक वर्तणूक या माध्यमातून तिसरी संभाव्य लाट आपल्याला रोखता येउ शकते.सध्या तरी जे नमुने तपासणीचे संशोधन सुरू आहे त्यातून कोविडचा नवीन व्हेरिअंट तयार झालेला नाही ही समाधानाची बाब समजली असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
१८ पेक्षा खालील वयोगटातील लसीकरणाचे प्रयत्न
१८ पेक्षा खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
The 100 crore mark of vaccination is being completed in the country. Maharashtra has also played a major role in it. 9.5 crore people in the state have been vaccinated. The first dose of 64 million or 70 percent of the people has been completed. However, health minister Rajesh Tope has opined that the remaining 30% vaccination is a challenging task.