मुंबई : उद्यापासून मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी कालपासून सुरू झालेल्या कोरोना चाचणीत विधिमंडळातील 8 जण पोजिटीव्ह आल्याचे समजले आहे.
या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण होऊन 14 दिवस झालेलेच कोरोना चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. कालपासून इच्छुक लोकांची, सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या आणि विधिमंडळात काम करणाऱ्या लोकांची चाचणी घेण्यात येत आहे, आज प्राप्त झालेल्या अहवालात एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 सुरक्षा कर्मचारी आणि विधानपरिषद सभापतींच्या कार्यालयातील 4 कर्मचारी असे 8 जण कोरोना पोजिटीव्ह आल्याचे आढळले आहे, यातील पोलीस अधिकारी अंधेरीच्या सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे.
अजून चाचण्या सुरूच असून आणखी किती जण पोजिटीव्ह येतात ते उद्या सकाळी स्पष्ट होणार आहे.The corona test, which began yesterday for the winter session in Mumbai from tomorrow, revealed that 8 people from the legislature were posing.