जगभरात प्रेक्षक समीक्षकांनी कौतुक केलेला ‘ओपनहायमर’ (Oppenheimer)आता ओटीटीवर(OTT) रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. 2023 साली रिलीज झालेल्या हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. भारतातही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळाली आहे.
कुठं पाहता येणार मोफत ओपनहायमर? : (Oppenheimer)
▪️ आता तुम्ही या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मोफत आनंद घेऊ शकता. ओपनहायमर हा चित्रपट 21 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर मोफत स्ट्रीम होणार आहे. आता तुम्ही घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.
चित्रपटाची कथा काय? :
▪️’ओपनहायमर’ (Oppenheimer)या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट अमेरिकन अणूशास्त्रज्ञ वैज्ञानिक रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनप्रवासावर बेतला आहे. सिलियन मर्फी यांनी रॉबर्ट यांची व्यक्तिरेखा साकारली होती.