आजपासून नवीन महिन्याला सुरुवात! ‘या’ नियमांत झाले मोठे बदल

एलपीजी दर (LPG rates):

मार्चच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी LPG) सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येही भाव वाढले होते. तर आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीLPG) सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. यासह दिल्लीतील किंमत 1795 रुपये झाली आहे.

 GST नियमांमध्ये बदल(Changes in GST rules) :

केंद्र सरकारने GST नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.सरकारकडून जीएसटीचे (GST) नियम बदलले जात आहेत. आतापासून 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्यांना ई-चलानशिवाय ई-वे बिल तयार करता येणार नाही. हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे.

  फास्टॅग(FASTag) :

आजपासून तुमचे केवायसी अपडेट न केल्यास फास्टॅग NHAI द्वारे निष्क्रिय केले जाणार आहे. यासोबतच काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल :
क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल : SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या किमान दिवसाचे बिल मोजण्याचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम 15 मार्चपासून बदलणार आहेत.
Social Media