ठाणे : धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी कुटूंबियांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी नातू रुद्रांशच्या साथीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी समस्त शिंदे कुटुंबियांसोबत मनसोक्त धुळवड साजरी केली.
यावेळी त्यांची पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे तसेच नातू रुद्रांश शिंदे तसेच घरातील कर्मचारीही सहभागी झाले होते.