हायपरटेंशनपासून सुटका करण्यासाठी हे उपाय करा

डाएट हेल्दी ठेवा(Keep your diet healthy) :

हायपरटेंशनपासून(Hypertension) वाचण्यासाठी आपल्या डाएटची काळजी घ्यावी. अरबट चरबट खाऊ नये. चुकीच्या खाण्याच्या सवयीने देखील हा आजार होतो.

वजन नियंत्रित ठेवणे (Keeping weight under control):

जर तुमचे वजन जास्त आहे. तर वाढत्या वजनावर नियंत्रण(Weight control) ठेवा. जास्त वजन झाल्यास देखील ब्लड प्रेशर(Blood pressure) वाढते.

कमी मीठाचा वापर करणे (Low salt consumption):

आपण कमीत कमी मिठाचा आहारात वापर करावा. कमी मीठ खाल्याने तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यात मदत मिळते. मिठात सोडीयमचे प्रमाण(Amount of sodium) असते ते ब्लड प्रेशर (Blood pressure)वाढविते.

ताण-तणाव वाढू देऊ नका(Stress) :

जास्त विचार केल्याने ताण-तणावामुळे देखील ब्लड प्रेशर वाढते. तुम्ही जेवढा ट्रेस घ्याल तेवढा ब्लड प्रेशर हाय होतो. यासाठी तुम्ही योगासने करा.

 योग आणि मेडीटेशन करा( Do yoga and meditation) :

योग आणि मेडीटेशन देखील ताण-तणाव(Stress) कमी करण्यास मदत करते. यष्टीकासन, हस्तपादांगुष्ठान, भद्रासन आणि मत्स्यासन सारखी आसने करा. योगासनाने रक्ताभिसरण(Circulation) चांगले होते. मन शांत होण्यास मदत होते.

Social Media