जालना : जालन्यातल्या परतुर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून जोरदार अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अकोली गावात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेची पडझड झाली आहे.
अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत खांब तुटल्याने वीज पुरवठा ही खंडित झाला आहे. परतूर तालुक्यातील अकोली गावात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत असून जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अकोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मोडतोड झाली.
शाळेचे पत्रे उडून गेले असून घरांची ही मोठ्या प्रमाणात पडझड झालीय. शिवाय अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब ही तूटून पडलेल्याने परतूर तालुक्यात वीज पुरवठा ही खंडित झाला. काल झालेल्या अवकाळी पावसाने परतूर शहरासह ग्रामीण भागात मोठे नुकसान केले असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.