मंकी बात…

निवडणुकीचा जो काही निकाल लागायचा तो लागेल, महाराष्ट्राने मोदींना फेस आणला हेच खरे!

मतदार राजा जागा राहा, रात्र वैऱ्यांची आहे

राजकीय पक्ष,नेते आणि संघटना याखेरीज नागरिकांचे मत हेच देशाचे, राज्याचे हिताचे मत असते या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती मत आणि राजकीय स्वातंत्र्याच्या मूलमंत्राचे पारायण नव्याने होताना दिसून आले. देशातील आणि राज्यातील जनता हीच या देशाची खरी मालक आहे हे संविधानाच्या प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच अधोरेखित झाले आहे. म्हणूनच या संविधानाची सुरुवात वी द पिपल ऑफ इंडिया’ अशी झाली आहे. याचे भान प्रत्येक जागरूक मतदाराला या निवडणुकीने आले आहे. जागरूकपणे मतदान केले पाहिजे फसव्या भूलथापा आणि जुमलेबाजी करणाऱ्या नेत्यांना ओळखून देशाच्या भल्यासाठी जागरुकपणे मतदान केले पाहिजे याची जाणीव मतदारांना झाली आहे आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे सारख्या अत्यंत महत्वाच्या शहरातील नागरिक महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि देशाची प्रगती तसेच रक्षण करण्यासाठी खुल्या मनाने योग्य पद्धतीनेच मतदान करतील अशी आशा बाळगूया..

 

लोकसभेच्या (Lok Sabha)2024 मधील पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई(Mumbai), ठाणे(Thane), नाशिक(Nashik), पालघर(Palghar) या चार जिल्ह्यातील 13 मतदार संघात शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होत आहे. निवडणूक आयोगाच्या(Election Commission) कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यात निवडणूक(election) होत असून सत्ताधारी भाजपने विशेषत: पंतप्रधान मोदी(PM Modi ) यांनी निवडणूक प्रचारात शेवटच्या दिवसापर्यंत जोर लावल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray), शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेस(Congress) या तीन पक्षांचे आव्हान पेलताना मोदींनी कधी नव्हे इतके दौरे करून जवळपास 48 मतदार संघ पिंजून काढल्याचे दिसून आले आहे. एवढे करुनही निवडणूक सर्व्हेक्षणात भाजपला मागील दोन लोकसभा इतके (42) स्थान मिळण्याची शक्यता नसल्याचे अनुमान व्यक्त केले जात आहे. शेवटच्या काही सभांमध्ये तर चक्क नरेंद्र मोदीच(Narendra Modi) बाळासाहेब ठाकरेंच्या(BalasahebThackeray ) प्रतिमेचा वापर करून मते मागताना दिसले, यावरून निवडणुकीत जो काही निकाल लागायचा तो लागेल, महाराष्ट्राने मोदींना फेस आणला हेच स्पष्ट झाले आहे.

लोकसभा-निवडणुक-२०२४

2019 नंतर महाराष्ट्रच्या राजकारणाने अनपेक्षित कूस बदलली आणि राज्यात भाजपला वगळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भाजपने राजकीय खिलाडू वृत्तीचा त्याग करून बदल्याचे राजकारण सुरू केले आणि त्याचा परिपाक जून 2022 मध्ये शिवसेना(Shiv Sena) फोडण्यात झाला. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)यांनी सांगितलेली राजकीय शुचिता आणि पार्टी विथ डिफरन्स(Party with Difference) ही आपली ओळख बाजूला ठेवून भाजपने बदल्याच्या राजकारणासाठी सत्तांतर घडवले आणि याच एका घटनेचे राजकीय भूत आता त्यांच्या मानगुटीवर बसले आहे. महाराष्ट्रातील सर्वात हुशार राजकीय नेता अशी प्रतिमा मिळवलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची महाराष्ट्राचे खलनायक अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. हे वास्तव असले तरी फडणवीस यांनी यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताना जे समर्थन, खुलासे आणि गौप्यस्फोट केले त्यातून तर त्यांनी स्वत:चेच राजकीय नुकसान करून घेतले आहे असे राजकीय जाणकार सांगतात.

2022 नंतर केवळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि त्यांचे 40,50 समर्थक आमदार घेवून शांत न होता फडणवीस (Fadnavis)यांनी पुढाकार घेवून राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar)आणि त्यांचे 40 समर्थक आमदार यांना देखील भाजपसोबत सत्तेत घेतले. त्यांनंतर महाराष्ट्रच्या राजकारणाचा, विकासाचा आणि एकुणच लौकीकाचा राजकीय तीन पैशाचा तमाशा पाहायला मिळाला. राज्यातील विकासाची कामे ठप्प झाली, उद्योगधंदे देशोधडीला लागले. शेतकरी हवालदिल झाले, विद्यार्थी-बेरोजगार आक्रोश करत होते, स्पर्धा परिक्षांचे निकाल लागत नव्हते, महिला अत्याचार कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले आरक्षण आंदोलनाने बेरोजगार तरुणांचे आयुष्य मातीमोल करण्याचे प्रयत्न झाले. राज्य बदहालीच्या उंबरठ्यावर येवून ठेपले, त्यातच केंद्र सरकारने राज्याचा विकासनिधी रोखल्याने महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या पीएमओमधून चालवले जात असल्याचा आरोप विरोधक करू लागले. राज्यातील महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका न होवू दिल्याने लोकशाही व्यवस्था संपुष्टात आल्या आणि प्रशासक राज सुरू झाले. त्यातून भ्रष्टाचाराच्या तसेच गैरकारभाराच्या प्रवृत्तींना चालनाच मिळाली. मुंबईत अलिकडेच होर्डिग(Hording) कोसळून नागरिक मृत्यू पावल्याची घटनाही याच महापालिकेच्या भोंगळ प्रशासकीय कामकाजाचा नमुना म्हणून सांगता येईल.

केंद्रीय-निवडणूक-आयोग

राज्यात जनतेचे प्रश्न वाऱ्यावर सोडून केवळ घोषणाबाजी आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षा कुरवाळण्याचे उद्योग होत राहिल्याने जागोजागी बंडखोरी, नेतेबाजी आणी तोडफोडीच्या राजकारणाचे पेव फुटले. अगदी ग्रामपंचायत(Gram panchayats) आणि वॉर्ड पर्यंत सत्त्तेतील फाटाफूट पाझरत गेली. त्यातच महाराष्ट्रातील उर्वरित अडीच वर्ष वाया गेली. या सगळ्या राजकीय पोरकटपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बेकायदेशीर घटनाबाह्य असल्याचे ठरवून देखील नितीमत्तेचे धडे देणाऱ्या भाजप नेत्यांनी पूर्णविराम न देता अडेलपणाचे बेमूर्वत राजकारण सुरूच ठेवले. इतके की  उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला चक्क  पंतप्रधान मोदीच नकली शिवसेना(Shiv Sena) म्हणू लागले तर शरद पवारांना भटकती आत्मा आणि उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणण्यापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी विधीविषेयक पाळला नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या  छत्रपती शिवरायांच्या न्यायप्रिय प्रामाणिक आणि स्वाभिमानी शिकवणीने आजवर अन्यायाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक प्रेरणा असलेला महाराष्ट्र ढवळून निघाला.

लोकसभा-निवडणूक-2024

 

त्याचे प्रंत्यतर राज्यात गेल्या महिनाभर सुरू असलेल्या राजकीय प्रचारसभेंच्या धुरळ्यात दिसून आले. महाराष्ट्राचे जनमानस आतताई राजकारणाला कंटाळले आहे, खोटेनाटेपणा करून सत्तांतर करताना हा मतदरांचाच अवमान आहे याची जाणीव निर्भय बनो सारख्या आंदोलनातून लोकांसमोर सुबुद्ध, सुजाण नागरिकांनीच मांडायचा यशस्वी प्रयत्न केला. राजकीय पक्ष,नेते आणि संघटना याखेरीज नागरिकांचे मत हेच देशाचे, राज्याचे हिताचे मत असते या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती मत आणि राजकीय स्वातंत्र्याच्या मूलमंत्राचे पारायण नव्याने होताना दिसून आले. देशातील आणि राज्यातील जनता हीच या देशाची खरी मालक आहे हे संविधानाच्या प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच अधोरेखित झाले आहे. म्हणूनच या संविधानाची सुरुवात ‘वी द पिपल ऑफ इंडिया’ अशी झाली आहे. याचे भान प्रत्येक जागरूक मतदाराला या निवडणुकीने आले आहे. जागरूकपणे मतदान केले पाहिजे फसव्या भूलथापा आणि जुमलेबाजी करणाऱ्या नेत्यांना ओळखून देशाच्या भल्यासाठी जागरुकपणे मतदान केले पाहिजे याची जाणीव मतदारांना झाली आहे आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे सारख्या अत्यंत महत्वाच्या शहरातील नागरिक महाराष्ट्र(Maharashtra) वाचवण्यासाठी आणि देशाची प्रगती तसेच रक्षण करण्यासाठी खुल्या मनाने योग्य पद्धतीनेच मतदान करतील अशी आशा बाळगूया आणि मतदार राजा जागा राहा रात्र वैऱ्यांची आहे असा इशारा देवून तूर्तास थांबूया…

 

किशोर आपटे

राजकीय विश्लेषक

मंकी बात…

Social Media