लोकसभा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने भुकंपाची शक्यता? : जाणकार सूत्रांची माहिती!

मुंबई : (किशोर आपटे) : महाराष्ट्राच्या राजकारणात २० मे नंतर राजकीय क्षीतीजावर तशी सामसुम दिसली तरी ही वादळापूर्वीची शांतता असेल असे म्हणायला वाव आहे. याचे कारण लोकसभा(Lok Sabha) निवडणुकीचे निकाल चार जूनला लागल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने भुकंप होण्याची शक्यता जाणकार सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. याचे कारण लोकसभेनंतर अवघ्या काही महिन्यात विधानसभा (Assembly)आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका(Elections) होण्याची शक्यता आहे. यावेळी सत्ताधारी महायुती आणि त्यांचे समर्थक तसेच महाविकास आघाडी आणि त्याचे समर्थक काय राजकीय उलथापालथ घडवून आणु शकतात यावर दोन्ही बाजूच्या सूत्रांकडून कानोसा घेतला असता भयंकर राजकीय भुकंप(Political earthquake) होण्याचे भाकीत वर्तवले जात आहेत.

सुरूवात महाविकास आघाडीपासून करूया. राज्यात सध्या जी राजकीय हवा आहे ती पाहता २०१९नंतर पहिल्यांदाच भाजपला वगळून दोन्ही कॊंग्रेस(Congress) आणि शिवसेना(Shiv Sena) तसेच अन्य मित्रपक्ष अशी राजकीय फळी तयार झाली आहे. हे राजकीय समिकरण काही भागात इतके जमले आहे की त्यामुळे महायुतीला उमेदवार देताना आणि प्रचार करताना पुरेवाट झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे मागील वेळच्या ४१+ जागा काही भाजप महायुतीला यावेळी महाविकास आघाडी मिळवू देणार नाही अशी स्थिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कमीत कमी पाच आणि जास्तीतजास्त दहा जागा कॉंग्रेस पक्षाला यावेळी मिळतील असे मानले जात आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून किमान चार ते सहा जागा जिंकल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून २१ जागा लढल्या जात असल्या तरी त्यांच्या किमान १२ ते १६ जागा विजयी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अघाडीला किमान २१ आणि कमाल ३० जागा जिंकता येतील अशी वातावरण निर्मिती प्रचारादरम्यान होती असे मानले जात आहे. याचा अर्थ भाजप आणि महायुतीच्या २१ म्हणजे निम्या किंवा १८ जागा विजयी होण्याची शक्यता आहे. त्यातही अजीत पवार यांच्याकडे किती जागा येतील आणि सर्वात महत्वाचे बारामती ते जिकंतील का यावर बरेच काही अवलंबून असेल. तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांची असेल त्यांच्या किमान किती जागा येतील आणि कल्याणची जागा ते राखतील का यावर त्याचे भवितव्य अवलबून असेल.

केंद्रात नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुन्हा सत्तेवर आले नाहीत आणि भाजप शिवाय इंडियाचे सरकार सत्तेवर आले तर भारतीय जनता पक्षांतर्गत देखील फाटाफूट होण्याची शक्यता असून राज्यात त्याचे पडसाद दिसून येतील. अश्यावेळी संघ आणि भाजप यांच्यात फारकत झाल्यास हिंदुत्ववाद्यांचा संघासोबतचा जुना भाजप आणि नवा मोदी शहांसोबतचा भाजप अशी फोड होण्याची शक्यता आहे. त्यात अन्य पक्षातून आलेल्या शिंदे पवार गटाच्या नेत्यांना जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र घरवापसी करत २०१४ २०१९ पासून धाकाने भाजप सोबत येणारे बहुतांश आमदार शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासोबत उगवत्याला नमस्कार म्हणत जाणे पसंत करण्याची शक्यता आहे. अश्यावेळी भाजपमधूनही किमान ३० – ३५ आमदार घरवापसी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच सध्याच्या महायुतीमधील १९६ पैकी किमान शंभरच्या आसपास आमदार आघाडीकडे वळले तर सध्याचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे.

अश्या स्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट (President’s rule)किंवा नवे महाआघाडीचे अल्पमताचे सरकार देखील अस्तित्वात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अश्या स्थितीत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक शिलेदार अजीत पवार(Ajit Pawar) यांची साथ सोडून घरवापसी करण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ नरहरी झिरवाळ माणिक कोकाटे असे काही आमदार पुन्हा महाविकास आघाडीकडे येण्याच्या मार्गावर आहेत हीच स्थिती अन्य भागात थोड्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातून असे इनकमिंग होत असेल तर त्याचा राजकीय फायदा घेत शरद पवार(Sharad Pawar) महायुतीला कमजोर करण्याची खेळी करत नवा डाव टाकून पुटीरांचा वेगळा गट तयार करण्याची आणि त्याला भुजबळांसारखे किंवा बच्चू कडू(Bachchu Kadu) यांच्यासारखे नेते मिळण्याची शक्यता आहे.

हिच गळती शिंदे यांच्या पक्षातही लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या कडील मोठ्या प्रमाणात आमदार ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेवून महायुतीकडून निवडणूक निकाल लागण्यापूर्वीच किंवा त्याच सुमारास मनसेच्या राज ठाकरे यांच्या ताब्यात शिंदेच्या सेनेचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचे पुन्हा घरवापसीचे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात असल्याने उर्वरित फुटीरांना भाजपात किंवा मनसेत सामावून घेत आव्हान कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल असे मानले जात आहे.

महायुतीचा मेगाप्लान(Megaplan of the Grand Alliance)

महायुतीच्या सूत्रांकडून मात्र  दुसरी शक्यता सांगितली जात आहे. निवडणूक निकालात शिंदे (Shinde)आणि पवार(Pawar) यांचे महत्व काय ते समोर आल्यानंतर त्यांच्याबाबत महत्वाचा निर्णय घेत भाजप राज्यात नेतृत्व बदल करेल आणि भाजपचा मुख्यमंत्री सत्तेवर येण्याची शक्यता आहे. केंद्रात काठावरचे बहुमत घेवून सरकार सत्तेवर येण्याची स्थिती असेल तर विधानसभेसाठी नवी रचना केली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेमक्या किती जागा कमी होतील याची चाचपणी करताना किमान ३५ ते ३८ जागा येण्याची शक्यता व्यक्त होत असून महायुतीमध्ये भाजपला फारतर ३ किंवा चार जागा गमवाव्या लागू शकतात तर मित्रपक्षाच्या दोन तीन जागा कमी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बारामतीमध्ये पवारांचा पराभव झाल्यास पूर्ण राष्ट्रवादीचा कब्जा अजित पवार घेतील आणि त्यांचे राज्यातील राजकारणात महत्व वाढेल तसेच ते फडणवीस यांचेही वाढेल. मात्र केंद्रात भाजपला सत्तास्थापनेसाठी काही जागांची गरज पडल्यास अश्या वेळी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव झाला असेल तर भाजपसाठी केंद्रात रसद मिळण्याची शक्यता कमी असेल. मात्र अजित पवार यांच्याकडून बारामती शरद पवार यांनी राखल्यास केंद्रातील सत्तेत भाजपला पवार मदत करतील का हे देखील बघावे लागणार आहे.

त्यामुळे भाजप नवा डाव रचून भाजपकडे मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी प्रयत्न करेल त्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा कसा सहभाग असेल ते पाहणे देखील रोचक असेल. एकूणच दोन्ही बाजूने चार तारखेनंतरच्या उत्तरायणाची जोरदार शक्यतांची तयारी झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पूर्ण

Social Media