मुंबई : सध्या लग्नसराईचा काळ अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी(Gold and silver) भरारी घेताना दिसत आहे. मात्र असे असताना देखील सध्या सोन्याचे व चांदीचे दर कायम आहेत.
गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला देखील भावात चढउतार दिसला नाही. अशातच आज 22 कॅरेट सोने 65,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची मुसंडी मारली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 200 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. अशातच आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,700 रुपये आहे.