मंकी बात…!

डोईजड झालेल्या शिंदे आणि पवारांचे ओझे बाजुला करण्यासाठी आता भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याची घोषणा होण्याची शक्यता?

सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र भाजपला डोईजड झालेल्या शिंदे आणि पवारांचे ओझे बाजुला करण्यासाठी आता स्वबळाच्या ना-याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. १५ ऑगस्टपूर्वी भाजप आणि मित्रपक्ष अश्या दोन स्वतंत्र आघाड्या तयार केल्या जाण्याची शक्यता आहे. शिंदे – पवार आणि मनसे सह आंबेडकर, जानकर, खोत, शेंडगे, कवाडे यांची एक महाविकास आघाडी सारखी मोट बांधली जाणार असून ज्याला जेवढ्या हव्या तेवढ्या जागा लढायला दिल्या जाण्याची शक्यता निर्माण केली जाणार आहे अशी आतल्या गोटातील चर्चा आहे. भाजपकडून १७५ ते १८० हार्ड हिटींग जांगावर लक्ष दिले. (याचे किमान चार निकष असण्याची शक्यता आहे.) जाणार असून त्यातून किमान १५०+ जागांचा करिश्मा केला जाण्याची शक्यता आहे. या जागा कोणत्या आणि त्या कश्या निवडल्या जातील याचा फॉर्म्युलाही तयार असून आता सर्व मतदारसंघातील लोकसभा आकडेवारी जमा करून त्यावर विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. १५ जुलै पर्यत हे काम पूर्ण होताच केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करून जोर का झटका धीरेसे देण्याचे काम केले जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन १२ जुलै ला संपले की भाजप ऐक्शन मोडवर येण्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

BJP

होळी सरली कवित्व उरले! अशी मराठीत म्हण आहे. तसेच लोकसभा २०२४चे निकाल लागले त्यानंतर गेल्या दहा दिवसांत त्यावर राजकीय पक्ष, नेते आणि माध्यमांतून चर्चा, विश्लेषणातून ऊहापोह झाला आहे. त्यातच भाजपच्या मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहनजी भागवत(Mohanji Bhagwat) यांचे प्रदिर्घ भाषण देखील व्हायरल(Viral) झाले असून देशभरात त्यावरून भाजप(BJP) आणि संघ(RSS) आमने सामने असल्याचे अनुमान काढून भविष्यवाणी आणि भाकिते केली जात आहेत. चार तारखेला निकाल लागल्यानंतर सहयोगी पक्षांसोबत नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सत्ता स्थापन करून सारी महत्वाची खाती आपल्याच पक्षाकडे ठेवून पहिला टप्पा पूर्ण केला आहे. भाजपला दोनवेळा पूर्ण बहुमत मिळवणारे मोदी यावेळी थोडे कमजोर पडल्याचे आणि भाजप २५०च्या बरीच आधी संपल्याचे दिसत आहे, त्यामुळे मोदींचा करिश्मा संपल्याचे सांगत अनेकांनी अगदी संघानेही डोळे वटारल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

असे असले तरी भाजपची शक्ती दक्षिणेत वाढली आहे. ओरीसात त्यांचा जुना मित्र बिजेडीला धक्का देत भाजपने सत्ता काबीज केली आहे. तमिळनाडूमध्ये(Tamil Nadu) मोठ्याप्रमाणात मतांचा टक्का वाढवला आहे, तर तेलंगण(Telangana), कर्नाटकमध्ये(Karnataka) कॉंग्रेसला रोखण्यात यश मिळवले आहे. केरळमध्ये (Kerala)खाते उघडले आहे. आंध्रमध्ये टिडीपीच्या(TDP) सत्तेसोबत आपलेही काम फत्ते केले आहे. त्यामुळे मोदी (Modi)हारले असा जो गवगवा होत आहे त्यामागे राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रासह, हरियाणा, पंजाब मधील खराब कामगिरी हाच मुद्दा प्रामुख्याने आहे. दिल्ली(Delhi), गुजरात(Gujarat), मध्यप्रदेश(Madhya Pradesh), छत्तिसगढ(Chhattisgarh,) आसाम(Assam), हिमाचल (Himachal)याभागात भाजपला धक्का देणे अद्याप इंडिया आघाडी(India Alliance) आणि खासकरून कॉंग्रेसला(Congress) शक्य झाले नाही. निवडणूक आयोगांच्या (Electoral commissions)भाजपला मदत करण्याच्या भुमिकेवरही प्रश्नचि्न लावली जात असून आयोगाच्या आकडेवारीच्या संशयास्पद कामगिरीवर आकडेतज्ज्ञ आणि सेफोलॉजीस्ट(Statistician and cephalologist) विश्लेषण करत आहेत. इव्हीएमचा(EVM) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत असून घोळ करून निकाल आल्याचा आक्षेप आहे तेथे भाजपचाच विजय कसा झाला आहे? असा सवाल केला जात आहे. हा गोरखधंदा उघड होण्याची शक्यता विचारात घेता सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यातून ‘तंत्रज्ञानाचा वापर करत खोट्याचा आधार’ घेतल्याचा आरोप देखील गंभीर मानला जात आहे.

BJP

मात्र काहींच्या मते भाजप आणि संघातील हे भांडण लुटूपूटचे आहे नुराकुस्ती आहे तर काहींच्या मते आता संघाने मोदींना बदलण्याची कवायद सुरू केल्याची ही नांदी आहे. तर काही विश्लेषक वेगळेच सांगत आहेत, जसे मुलाने गावात काहीतरी समाजाविरोधी वर्तन केले आणि त्याचा बभ्रा, बोंबाबोंब गावभर झाल्यावर लोकांच्या आधी त्या मुलाचा बापच त्याला दरडावून दोन-चार लावून देतो आणि गावचा मार खाण्यापासून वाचवितो तशी भागवत यांची कृती आहे. तर काहींच्या मते हतबल झाल्याने संघाचे हे अरण्यरुदन आहे, त्याला भाजप आणि मोदी यांनी आधीच आम्हाला गरज राहिली नाही असे उत्तर देवून टाकल्याने झालेला हा तिळपापड आहे!

महाराष्ट्र

कारणे आणि विश्लेषण काही असो देशपातळीवर मोदी पुन्हा एकदा नव्या सरकारमध्ये स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहेत. प्रश्न आता महाराष्ट्रात येत्या तीन महिन्यांनी जी विधानसभा निवडणूक आहे, त्यात भाजप कशी सावरणार? याचे विश्लेषण करण्याचा आहे. २०१९ ते २०२४ हा भाजपच्या आक्रस्ताळी राजकीय आगावूपणा आणि अहंकारी राजकारणाचा इतिहास म्हणून आता कायम सांगितला जाणार आहे. पण खरी गंमत अशी आहे की त्याचे परिणाम भाजपला आता विधानसभेतही भोगावेच लागणार आहेत. भाजपने आता लगेच आयाराम पध्दतीने दबाव जोरजबरदस्तीचे राजकारण सोडून द्यायचे म्हटले तरी ते शक्य होणार नसून जे काही पेरले आणि उगवले आहे त्याची कापणी आता करण्यात विधानसभा निवडणूकही हातून जाण्याची शक्यता आहे.

याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे भाजपमध्ये अन्य पक्षांतून येवून आपला उल्लू सिधा करण्याचा प्रयत्न करणारे नेते आता बंधपाश सैल झाल्याने बाहेर पडायला लागले तर राज्यातील १०५ आमदारांच्या भाजपमधून किमान ५० जण बाहेर जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार १८० मतदारसंघात महायुतीची पडझड झाली आहे, त्यात सुधारणा करण्याची संधी असल्याने आयारामांना बाहेर जाण्याशिवाय किंवा ते गेले नाहीत तरी त्याजागी मूळच्या भाजपच्या निष्ठावंताची वर्णी लावून काम सुरू करण्याची भाजपला गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मग हे बाहेरून आलेले आपोआप शोधू कुठे किनारा म्हणत बाहेर पडतील.

महाराष्ट्र

सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र(Maharashtra) भाजपला डोईजड झालेल्या शिंदे(Shinde) आणि पवारांचे ओझे बाजुला करण्यासाठी आता स्वबळाच्या ना-याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. १५ ऑगस्टपूर्वी भाजप आणि मित्रपक्ष अश्या दोन स्वतंत्र आघाड्या तयार केल्या जाण्याची शक्यता आहे. शिंदे – पवार आणि मनसे सह आंबेडकर, जानकर, खोत, शेंडगे, कवाडे यांची एक महाविकास आघाडी सारखी मोट बांधली जाणार असून ज्याला जेवढ्या हव्या तेवढ्या जागा लढायला दिल्या जाण्याची शक्यता निर्माण केली जाणार आहे अशी आतल्या गोटातील चर्चा आहे. भाजपकडून १७५ ते १८० हार्ड हिटींग जांगावर लक्ष दिले. (याचे किमान चार निकष असण्याची शक्यता आहे.) जाणार असून त्यातून किमान १५०+ जागांचा करिश्मा केला जाण्याची शक्यता आहे. या जागा कोणत्या आणि त्या कश्या निवडल्या जातील याचा फॉर्म्युलाही तयार असून आता सर्व मतदारसंघातील लोकसभा आकडेवारी जमा करून त्यावर विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. १५ जुलै पर्यत हे काम पूर्ण होताच केंद्रीय नेत्यांसोबत चर्चा करून जोर का झटका धीरेसे देण्याचे काम केले जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन १२ जुलै ला संपले की भाजप ऐक्शन मोडवर येण्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

या नव्या रचनेमुळे उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडून आघाडीबाहेर पडून २८८ जागा लढण्याच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) आणि कॉंग्रेस यांच्याकडून वेगळ्या राजकीय खेळी करण्याच्या संकल्पाना शह देता येणे शक्य होणार आहे. महाआघाडी विरुध्द महायुती शिवाय आता आणखी तिसरी आघाडी उभी राहिल्यास अतिरिक्त मतांची जोड तोड करून काही जागा अतिरिक्त मिळाल्यास त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येही चिंतन मंथन सुरू झाले आहे. लोकसभा निकालानुसार ज्या जागांवर महाविकास आघाडीला ५०हजार मतांपेक्षा कमी ‘लीड’ आहे अश्या किमान २०० जागांवर भाजपचे लक्ष असून स्थानिक समिकरणांचा अभ्यास करून या जागा मिळवण्याची रणनिती केली जाण्याची शक्यता आहे.

पूर्ण

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

मंकी बात…

Social Media