मंकी बात…

सत्तेच्या सारीपटावर होणार मोठ्या हालचाली! भाजपकडून मोठ्या फेरबदलांची तयारी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EknathShinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकररविंद्र चव्हाणगणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहेत्याचवेळी उध्दव ठाकरे (UddhavThackeray)यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहेत्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणेचंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट, पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार(SharadPawar)यांच्या पक्षफुटीबाबतचे खटलेप्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहेत्यात शिंदे आणि अजित पवार(AjitPawar)यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेंना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहेत्यावेळी शिंदे पवारांना बाजुला तिसऱ्या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत नाअशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

मागील सप्ताहात संसदेत आणि राज्याच्या विधिमंडळात देखील विरोधीपक्षनेते चर्चेत राहिले.  संसदेत गेल्या दहा वर्षापासून रिक्त असलेल्या विरोधीपक्ष नेते पदावर राहुल गांधी ( Rahul Gandhi)यांनी आपले अस्तित्व दाखवून देतानाच संविधानाच्या शक्तीचा परिचय भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना दे माय धरणी ठाय करणारे भाषण करून संसदेत अभूतपूर्व जान आणली. तर राज्याच्या विधानपरिषदेत विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबीत करण्याची अभूतपूर्व घटना घडली. तर येत्या आठवडाभरात राज्यातील भाजपात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि अमित शहा महाराष्ट्रात दौ-यावर असून ते संघटनात्मक बाबींवर झाडाझडती घेणार आहेत.

लोकसभेच्या निवडणूकीनंतर पहिल्याच संसदीय सत्रात संख्याबळाच्या तुलनेत जवळपास भाजपशी तुल्यबळ असलेल्या इंडिया आघाडीच्या खासदारांची यावेळची ताज्या दमाची फळी उभी राहिली आहे. अगदी समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी (शप) या पक्षाचे खासदार नजरेला नजर भिडवून संसदेत सत्ताधा-वर विशेषत: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या घणाघाती टिका करताना दिसत आहेत. संसदेच्या या पहिल्याच सत्रात राहूल गांधी यांना विरोधीपक्षनेते म्हणून इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पहिल्याच भाषणातून त्यांनी आपल्या संविधानीक दर्जा, अधिकार आणि धमक दाखवून दिली आहे. राहूल गांधी यांच्या यावेळच्या वक्तव्यात आक्रमक आत्मविश्वास तर दिसत होताच या शिवाय धोरणी राजकीय रणनिती असल्याचे देखील जाणवले. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर लोकसभा अध्यक्ष झुकतात, भाजपचे बडे नेतेही घाबरतात असा थेट उल्लेख करत राहूल गांधी यांनी भाजपचे राजकीय भांडवल असलेल्या हिंदुत्वांच्या मुद्यालाच हात घातला. हिंदू धर्म अहिष्णुता, हिंसा आणि दमन यांना थारा देत नाही, किंबहुना असे जो कुणी वागत असेल आणि स्वत:ला हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाहीच. आम्ही सारे हिंदू आहोत, केवळ भाजप मोदी शहा आणि संघ म्हणजे हिंदू नाहीत. हिंदूंच्या दैवतांनी देखील अभयमुद्रा दाखवत हिंसा भय दमन यांना थारा दिलेला नाही हे सचित्र मांडायचा प्रयत्न गांधी यांनी केल्याने भाजपच्या दूखत्या रगवर त्यांनी हात ठेवला. त्यात त्यांना थांबविण्यात भाजपनेते आणि लोकसभाध्यक्ष ओम विरला यांना यश आले नाही. गांधी यांचा माईक बंद करण्याचा त्यांचे थेट प्रक्षेपण न करण्याचा आणि कामकाजातून त्यांच्या टिेकेच्या उल्लेखांना वगळण्याचा प्रयत्न मात्र झाला. त्यालाही गांधी यांनी स्वत: आक्रमकपणे उत्तर दिले. तर नरेंद्र मोदी यांना दोन तास भाषण करूनही गांधी यांच्या एकाही मुद्यावर सडेतोड उत्तर देता आले नाही. यातून हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्नशीला असलेल्या संघ भाजप आणि मोदी सरकारला गांधी यांनी मुळावर घाव घालून त्यांच्या भविष्यातील योजनांना आपण कडाडून विरोध करत असल्याचे संकेत दिले आहेत. राहूल गांधी आता ‘पप्पू राहिले नाहीत’ हे त्यांनी आपण संपूर्ण इंडियाचे विरोधीपक्षनेते म्हणून बोलत आहोत असे सांगून दाखवून दिले. त्यांचा रुद्रावतार पाहून सभापती बिरला देखील थिजल्याचे पहायला मिळाले.

(

विधान परिषदेत मात्र राहूल यांच्या या वक्तव्यांचे पडसाद उमटले. राहूल गांधी यांच्या वक्तव्यावर सदनात आक्षेप घेण्याचा प्रयत्न भाजपचे प्रसाद लाड यांनी केला. त्यावेळी वरिष्ठ सभागृहातील बाबीवर येथे मत व्यक्त करता येत नाही असे सांगायचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीत लाड यांना दानवे यांनी अपशब्द वापरल्याने गदारौळ झाला. त्यानंतर तडकाफडकी निर्णय घेत सभापतीनी पाच दिवसांसाठी दानवे यांना निलंबीत करण्याची घोषणा केली मात्र तीन दिवसांनी या शिक्षेत सूट देत त्यांना माफी देखील देण्यात आली. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी माफी मागत आपल्या मोठ्यामानाचा परिचय देण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे मोफतच्या योजनाना रेवडी म्हणणा-या नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या नेतृत्वाला आदर्श मानून काम करणा-या शिंदे सरकारने दौलत जादा करणा-या योजना शेतकरी महिला आणि बेरोजगार तरूण यांच्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. या योजनेत सर्वात गाजावाजा होतोय तो मुंख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा! या योजनेच्या अटी शिथील करत सरकारने आता ऑगस्ट अखेर एकदम दोन महिन्याचे अनुदान देण्याची तयारी केली आहे. पण योजनेचा अर्ज भरायला जी झुंबड उडाली आहे त्यात पैसे देणाराना प्राधान्य देत लूट केली जात आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संधी साधली असून आता दलालांनी देखील योजनेचा ताबा घेतल्याचे जागोजागी दिसत आहे. त्यामुळे माता भगिनीना चिरिमीरी घेवून अर्ज भरून देण्यासाठी मदत करण्याचे पेव फुटले आहेत. एवढ करून हा अर्जाचा नमूना पहा त्यात खाजगी सारी माहिती महिलांनी भरल्यानंतरही त्यांना अन्य योजनेत फायदा मिळत असेल कुटूंबात कुणी शासकीय सेवेशी संबंधित  असेल किंवा आयकरदाता असेल तर योजनेचा फायदा मिळणार नाही. या योजनेला जी अमाप प्रसिध्दी आणि गवगवा केला जात आहे त्यामुळेही योजनेचा बोजवारा उडण्याचीस शक्यता आहे कारण त्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूदच राज्य सरकाने केली नसल्याचे समोर आले आहे.

काही असो सध्या राज्यात लोकसभेला सपाटून मार खाल्लेल्या भाजपला आता विधानसभेत जर यश मिळाले नाही तर पक्षाचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा मतांच्या विश्लेषणानंतर करण्यात आलेल्या  अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाला केवळ ४० – ५० जागा मिळण्याचा धक्कादायक अहवाल आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याकरीता आता नरेंद्र मोदी मुंबईत तर अमित शहा येत्या सप्ताहात पुण्यात येवून पक्षाच्या नेत्यांची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे मोठे राजकीय बदल करत भाजप कदाचित राज्यातील महायुतीच्या घटकपक्षांना पुढे करत लढण्याची नवी रणनिती तयार करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच आता संजय केळकर, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक अश्या भाजप नेत्यांकडून शिंदे यांना राजकीय आव्हान आणि शह देण्याचा प्रयत्न केला जात असून ऐनवेळी शिंदे यांच्याशी घरोबा तोडण्याच्या पर्यायावरही भाजपमध्ये मंथन सुरू आहे. त्याचवेळी उध्दव ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याचा आणि त्यांच्या कलाने राजकीय पावले टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचाच परिपाक ठाकरे आणि फडणवीस यांचे उदवाहनातून एकत्र जाणे, चंद्रकांत पाटील यानी चॉकलेट पेढे भरवायला जाणे आणि मिलींद नार्वेकर यांना आघाडीकडे संख्याबळ नसताना ठाकरेंकडून  विधान परिषदेत उमेदवारी देण्याच्या घटनात दिसून आल्याचे या सूत्रांचे मत आहे.

Thackeray-Modi 
ठाकरे-मोदी

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षफुटीबाबतचे खटले प्रलंबित आहेत आणि त्यात मुख्य न्यायधिश चंद्रचूड लवकरच निवृत्ती होण्यापूर्वी निकाल देण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचे आयोगाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले तर विधानसभेला ठाकरेना नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी शिंदे पवाराना बाजुला तिस-या आघाडीत  ठेवत भाजप आणि ठाकरे एकला चलो रे अशी २०१४ च्या राजकारणाची पुनरावृत्ती तर करणार नाहीत ना? अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.  ‘झाले गेले गंगेला मिळाले’ म्हणत विधानसभे नंतर ठाकरे आणि शिंदे यांचे पक्ष एकत्र झाले तर एनडीएचे संख्याबळ केंद्रात वाढते आणि राज्यात पुन्हा  शिवसेना नवा मुख्यमंत्री देखील येवू शकेल. भाजपच्या नव्या फेरबदलांच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचे देखील स्थान निश्चित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी मोदी शहा आता जातीने राज्याच्या राजकारणात लक्ष घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या अंतर्गत एका गटाला मात्र पुन्हा उध्दव यांच्यासोबत जाणे योग्य नसल्याने त्यांच्याकडून मुख्यमंत्री गटाच्या मदतीने अंबादास दानवे यांच्या निलंबनासारखे निर्णय घेतले जावून खो घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे. काहीही असो राजकारणात आणि युध्दात सारे काही माफ असते म्हणतात! राज्यातील जनतेला आता नव्या राजकीय घडामोडींचा प्रत्यय लवकरच येण्याची शक्यता आहे हे नक्की!

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

 

 

मंकी बात….

Social Media