जुलै महिन्यात चांदीसह सोन्याचे भाव(Gold prices) चांगलेच वधारले आहेत. आणि भारतीयांचे सोन्याच्या दागिन्यांवरील प्रेम तर जगजाहीर आहे. पण घरात सोनं बाळगण्याला पण सरकारकडून एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घरात किती सोनं ठेवू शकतो? चला जाणून घेऊया.
भारतात विवाहित महिला 500 ग्रॅम सोने घरात ठेवू शकते. तर अविवाहित महिला 250 ग्रॅमपर्यंत सोने घरात ठेवू शकते. त्याचबरोबर पुरुषांना केवळ 100 ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे.
तसेच जर तुम्ही घोषीत उत्पन्नातून किंवा कर मुक्त उत्पन्नातून सोन्याची खरेदी केली आहे. किंवा वारसाहक्कातून तुम्हाला सोनं मिळालं आहे तर त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. पण जर तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्याला विकायला गेला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे.