आगामी विधानसभा निवडणुकीत समनक जनता पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा.

टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत समनक पक्षाचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांची घोषणा.

मुंबई : भटक्या विमुक्त आणि उपेक्षित समाजाच्या विविध प्रश्नांना काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो त्यामुळे समनक जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहे, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी आज टिळक भवन(Tilak Bhavan) येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्या उपस्थितीत केली.

“गोर बंजारा समाज हा लढवय्या आहे, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची ताकद या समाजामध्ये आहे. या समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्यात प्रवर्गात समावेश आहे. काही राज्यात एसटी प्रवर्गात तर काही राज्यात भटक्या विमुक्त संवर्गात समावेश आहे. या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आहे. गोर बंजारा समाजाच्या मागणीला न्याय देण्याचे लेखी आश्वासन २०१४ साली नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी रामराव महाराज यांना दिले होते पण मोदींनी अद्याप हे आश्वासन पूर्ण केलेले नाही. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना हाच उपाय असून काँग्रेसची पक्षाची तीच भूमिका आहे”,असे नाना पटोले यांनी सांगितले.कर्नाटक विधानसभेत समनक जनता पार्टीने काँग्रेसशी युती केली त्याचा फायदा झाला. या युतीचा महाराष्ट्रातही काँग्रेसला फायदा होईल, असे समनक जनता पक्षाचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस सचिव मदन जाधव, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संपत चव्हाण, समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. डॉ. अनिल राठोड, राष्ट्रीय महासचिव प्रियंका राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता आकाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते अविनाश चव्हाण, उद्धव पवार, माधवराव जवळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Social Media