भाजपच्या अधिवेशन बैठकीआधी  देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांसोबत अमीत शहाची गुप्त बैठक!

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेली निराशा या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला असून पुण्यात भाजपच्या अधिवेशन बैठकीआधी शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि अन्य नेत्यांसोबत शहा यांची महत्वाची गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शाह(Amit Shah ) आणि फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अधिवेशनाआधी झालेल्या अमित शाहांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची तसेच विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांसोबत करायच्या जागावाटपासह रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी माध्यमांशी बोलताना लवकरच राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होईल असे म्हटले होते. त्या अनुषंगाने फडणवीस आणि शाह यांच्यात याबाबतची चर्चा झाली असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय पुण्यात रविवारी होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनातील राजकीय ठराव, विधानसभा निवडणूकीतील जागा वाटपाबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रेल्वेमंत्री आणि महाराष्ट्र प्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Social Media