मंकी बात…

अरे जोर से बोलो, शहांचे ‘दम’दार भाषण; तर दादासाहेबांचे अंशत: ‘एकला चलो’ ची घोषणा? भाजपच्या गोटात फडणवीस टू तावडे खांदेपालटाची चर्चा?

 

Amit-Shah

गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुण्यात दोन महत्वाच्या राजकीय मेळाव्यांची चर्चा होती. एक दादासाहेब बारामतीकरांचा पिंपरीतील मेळावा आणि दुसरा महाशक्तीचे चाणक्य यांचा पुण्यात बालेवाडीतील महामेळावा! त्यांनी आपल्या ‘दम’दार शैलीत ‘अरे जोर से बोलो” असे वारंवार उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले. राज्यातील लोकसभा निकालात २३वरून ९वर आलेली भाजपची कामगिरीची कसर भरून काढण्यासाठी जोरदार तयारीला लागा असे आवाहन करतानाच त्यांनी शरद पवार (Sharad Pawar)राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर शेलक्या शब्दात टिका देखील केली. पण त्यांच्या या अधिवेशनानंतर भाजपच्या गोटात जोश दिसलाच नाही. या अधिवेशनात फडणवीसांपेक्षा विनोद तावडे(Vinod Tawde) यांचा वरचष्मा दिसला त्यामुळे विधानसभा (Assembly)निवडणुकीत प्रदेश भाजपमध्ये फडणवीसाना पर्यायी नेतृत्व शोधण्याचा या प्रयत्न असावा असे सांगण्यात येत आहे.

‘गिरे तो टांग ऊपर’ अशी राष्ट्रभाषेत म्हण आहे त्याची आठवण देत कलम ३७०(Article 370), राम मंदिर(Ram Temple) काशी विश्वनाथ(Kashi Vishwanath) कॉरीडॉर युसीसी दहशतवादाचा नक्षलवादाचा बिमोड. ओरिसा(Orissa) मध्ये पक्षाची सत्ता असे जुनेच मुद्दे सांगत ‘मोटा भाय’ मने अमित शहा(Amit Shah) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आलेली मरगळ निराशा झटकून टाकण्यासाठी प्रत्येक वेळी ‘अरे जोर से बोलो’ म्हणत आपल्या भाषणाला त्यांचा प्रतिसाद घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ३० वर्षासाठी भाजपचे राज्य देशात राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 Sharad-Pawar

ते म्हणाले की  दोन विद्यार्थी होते एक सत त नापास होत असे त्याला पाच दहाच्या वर मार्क मिळत नव्हते यावेळी त्याने ३० मिळवले पण नापास तो नापासच आहे आणि नेहमी ८० मार्क घेणा-या विद्यार्थ्याला यावेळी ७८ मिळाले पण तिस-यांदा तो सत्तेवर आला. तर थोडे कमी मार्क मिळाले म्हणून नाराज न होता जोमाने कामाला लागायचे आहे.  ते म्हणाले की तिस-यांदा मोदी(Modi) पंतप्रधान झालेच पण त्यांना अहंकार नाही पण कॉंग्रेस आणि विरोधक हारल्यानंतरही अहंकार आणि आनंद साजरा करत का आहेत?

भाजप गरीब कल्याण काम करत आहे. कॉंग्रेसवाले अप प्रचार करत आहेत. फुले आंबेडकरांच्या मार्गावर चालायचे काम भाजपनेच केले. भ्रम पसरविण्याचे काम झाले आरक्षण संपविण्याचा अप प्रचार करण्यात आला.पण २० वर्षाचे आरक्षण मोदीनीच वाढवले असे काही मुद्दे मांडून झाल्यावर ते पवार यांना उत्तर देतो म्हणत मूळ मुद्यावर आले.

भाजपचे सरकार आले की मराठा आरक्षण(Maratha reservation) दिले जाते. पवार आले की गायब होते.  हे मी विचार करून बोलतोय. १४ मध्ये आम्ही दिले २० मध्ये शरद पवार आले घालविले. पुन्हा आम्ही दिले आहे पण पवारांचे सरकार आले तर घालवतील असा आवेशपूर्ण आरोप त्यांनी केला.  दुधाची पावडर आयातीचे धोरण शरद पवारांनी निर्णय घेतला होता. मात्र ते आता दोष आम्हाला का देत आहेत? भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार पवार आहेत. यावेळी आपले खोटे चालणार नाही.  विधानसभा निवडणूकीत(Assembly elections) आता आपण महाराष्ट्र हरियाणा झारखंड जिंकू राहूल गांधीचा(Rahul Gandhi) अहंकार चूर चूर होणार असे म्हणत त्यांनी नेहमीच्या शैलीत उपस्थितांकडून अरे जोर से बोलो म्हणत दादही घेतली.

Uddhav-Thackeray

शरद पवारांनी दहा वर्ष केंद्र आणि राज्यात सरकार होते तेंव्हा राज्याला काय दिले?असा नेहमीचा सवाल करत त्यानी त्यांच्या १लाख ५१ हजार कोटीच्या तुलनेत दहा वर्षात १० लाख पाच हजार कोटी दिले. त्याचा पुण्यात मुरली मोहोळ हिशेब देईल असे सांगितले. यात नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर रोड, मेट्रो, रेल्वे, बुलेट ट्रेन(Bullet train) चा हिशेब नाहीच, अटल सेतू (Atal Setu)अकरा हजार कोटी पालखी मार्ग विमानतळ मत्स्य पालन अश्या इतरही विकासकामांची यादी त्यांनी वाचली. पवारांच्या काळात सहकारी कारखान्याचा दहा हजार कोटीचा आयकराचा प्रश्न होता. त्यांना तो सोडविता आला नाही, मी दिड मिनीटात सोडविला. नारीशक्ती आरक्षण दिले, माझी लाडकी बहिण नया क्या है तुम्ही का नाही केले. लोक तुम्हाला करायची संधी देणार नाही. खटाखट वर लोकांनी विश्वास ठेवला नाही. कॉंग्रेसच्या राज्यात का नाही केले. असे म्हणत त्यानी राहूल गांधीवर टिकाही केली. फडणवीसांनी अनेक क्षेत्रात काम केले. असे सांगत २०१४ ते २०१९चा त्यांचा विकास कामांचा काळ लोक लक्षात ठेवतील. असे सांगत त्यांनी पुन्हा फडणवीसच राज्याचे नेतृत्व करण्याचे संकेत दिले. १३ जुलै रोजी मोदी आले ३० हजार कोटीची कामे सुरू केले. पण बाबासाहेबांचा अवमान कॉंग्रेसने केला. दोन वर्षात देश नक्षल मुक्त होणार आहे. दहशतवाद(terrorism) मुळापासून संपविणार आहे.

भाषणाच्या शेवटी औरंगजेब(Aurangzeb) फॅन क्लबचे नेते उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) आहेत. याकूब झाकीर नाईक, कसाबला बिर्याणी देणा-यांसोबत तुम्ही बसला आहात लाज वाटली पाहिजे असे ते म्हणाले. आणि जरा जोर से बोलो म्हणून प्रत्येक मुद्यावर उपस्थितांची दाद घेत राहिले. त्यांच्या या ‘दम’दार भाषणाच्या वेळी विजयकुमार गावित, अशोक चव्हाण विखे पाटील पिता पूत्र, यांच्या चेह-यांवर सुतकी हास्य स्पष्टपणे दिसत होते. मात्र शरद पवार उध्दव ठाकरेंवर त्यांनी टिका केली त्यावेळी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या चेह-यावर कौतूकमिश्रीत बोलके भाव झळकताना दिसत होते. शेवटी देश प्रथम नंतर पक्ष नंतर स्वत: हे सूत्र सांगत त्यांच्या भाषणाचा समारोप झाला आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकल्यासारखा आनंद व्यक्त केल्याचे दिसले म्हणे!.

 Devendra-Fadnavis

भाजपच्या चाणक्यांच्या भाषणाआधी देवंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या भाषणात चातुर्मासात विधानसभेच्या निवडणुकीसाठी भगव्यासाठी तपश्चर्या करायची आहे. असे सांगत २०१३ मध्ये येथेच अधिवेशन झाले आणि सत्ता आली असे सांगत पुन्हा महायुतीचे सरकार येईल आणि मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असा विश्वास व्यक्त केला. लाडकी बहिण योजनेसाठी विरोधक खोटे अर्ज भरून घेत आहेत, त्यामुळे नंतर कुणाला पैसे मिऴाले नाहीत तर आम्हाला दोष देवू नका असा इशारा त्यांनी दिला. मुलींना मोफत शिक्षण मोफत तीन सिलेंडर्स, शेती पंपाना मोफत वीज, अश्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी कार्यकर्त्यांना आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोकून काढा असे आवाहन केले. खोटे पसरविणा-याना जोरदार उत्तर द्यायला उतरा असे ते म्हणाले. दोन वर्षात सर्व शेतीपंप सोलरवर येतील असे ते म्हणाले. भाजपचे मंत्री लोढा, चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयाच्या योजनांबाबत त्यानी प्राधान्याने माहिती दिली. यावर भेटेल त्याला ते वैतागले तरी त्यांना योजनांची माहिती द्या असे ते म्हणाले. पुन्हा फेक नेरेटिव चालू देवू नका असे सांगत ते म्हणाले की मोठे षडयंत्र करून खोट पसरविले जाते.

यामागे देशविरोधी शक्ती आहेत असेही ते म्हणाले. मराठ्याना ओबीसीमधून(OBCs) आरक्षण द्यायचे किंवा नाही हे एकदा पवार, पटोले आणि ठाकरे यांना सांगावेच लागेल असे ते म्हणाले. फडणवीस(Fadnavis) यांच्या भाषणातही कार्यकर्त्याकडून प्रतिसाद मिळत होता. मात्र त्यांच्या भाषणातही हिंदू-मुस्लिम, फेक नेरेटिव दहशत(terror) आणि नक्षलवाद(Naxalism) अश्या मुद्यांशिवाय नवे काही नव्हते. केवळ दोन लाख मतांचा फरक आहे शासनाच्या योजना जाहीर झाल्या तेंव्हाच ते वाढले. असे सांगत त्यांनी कविता सादर केली. मात्र फडणवीसांचे भाषण सुरू असताना पंकजा मुंडे(Pankaja Munde) आणि विनोद तावडे(Vinod Tawde) बाजु बाजुला बसून कानगोष्टी करताना दिसत होते! ९० टक्के कार्यकर्ते जीवनात काही मिळणार नाही हे माहिती नसूनही काम करतात. त्यामुळे नवे जुने असा भेद पक्षात करण्याची गरज नाही. केवळ सत्तेसाठी भाजप काम करत नाही. शिंदे-पवार यांना सोबत घेण्याच्या निर्णयाबाबत ते म्हणाले की राजकारणात कधी तह करावा लागतो कधी दोन पावले मागे घ्यावी लागतात. पद मिळाले म्हणून आम्ही मोठे नाही आमच्याही चूका होतात त्या पोटात घाला असे ते म्हणाले. तिकडे पिंपरीत दादासाहेब बारामतीकर यांनी पक्षाच्या मेळाव्यात विधानसभेत महायुती आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

 

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

 

आरक्षणाचे बुमरँग आणि महायुतीचे राजकारण 

मंकी बात…

Social Media