गेटवे ऑफ इंडिया(Gateway of India) – 1924 मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांच्या स्वागतासाठी ही देखणी इमारत बांधली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गॉथिक शैलीतील ही देखणी इमारत युनेस्कोच्या वारसा यादीत आहे.
▪️मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली होती. राजाबाई टॉवरचे घड्याळ प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी येथील मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे.
▪️हाजी अली दर्गा(Haji Ali Dargah) वरळीत असून 15 व्या शतकातील आहे. संगमरवरी दगडांची ही इमारत इंडो- इस्लामिक शैलीची आहे. फ्लोरा फाऊंटन साल 1864 मध्ये मुंबईतील फोर्ट येथे ब्रिटीशांनी बांधले होते.
▪️मुंबई उच्च न्यायालयाची इमारत 1878 ची आहे.टिळकांवर ब्रिटीशांनी देशद्रोहाचा खटला येथे भरला. एलिफंटा येथील गुहा 5 ते 8 व्या शतकातील आहेत. येथील शिवाची दगडातील मूर्ती प्रसिध्द आहे.
▪️महात्मा गांधी मणीभवन येथे 1917 व 1934 मध्ये आले, स्वातंत्र्य लढ्यात केंद्रस्थानी ही जागा होती. महालक्ष्मी येथील धोबी घाट जगातील सर्वात मोठी उघड्यावरील लॉण्ड्री आहे.