अभियंता दिनी इतिहासातील राष्ट्र व समाजजीवन उभारणीत भटकेविमुक्त जातींच्या अभियांत्रिकी योगदानाचे स्मरण

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या(Bharat Ratna Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी झाला. हा दिवस भारतात सर्वत्र इंजीनिअर्स डे किंवा अभियंता दिन (Engineers Day)म्हणून साजरा करतात, कारण डॉ. विश्वेश्वरय्या (Dr.Visvesvaraya)यांनी भारतात आधुनिक इंजीनिअरिंगचा पाया घातला.ते जागतिक कीर्तीचे अभियंता आणि नवभारताचे एक निर्माते म्हणून ज्यांचा गौरव केला जातो.

Bharat-Ratna-Mokshagundam-Visvesvaraya

वैज्ञानिक,आर्थिक,सामाजिक व प्रत्यक्षातील रोजच्या अनुभवातून मिळालेले ज्ञान वापरण्याच्या कौशल्यांना,व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात व त्या कौशल्यांचा गणित,विज्ञान आणि तंत्रज्ञान वापर करून समस्या सोडवतात त्यांना अभियंता(Engineers) असे म्हणतात.

भारतात आगदी  प्राचीन काळापासून  आपल्या पारंपरिक  कौशल्याचा ,ज्ञान विज्ञानाचा वापर करून जीवनयापन करणाऱे  काही जाती समूह होते व त्यातील काही जाती या आजच्या भटक्या  विमुक्त जाती होत. मनु (लोहार) म्हणजे लोहशिल्पकार(Ironsmiths) हा विश्वकर्माच्या मोठा पुत्र यांचे वंशज वेदकाळापासुन धनुष्य, खडग, चक्र, गदा, त्रिशूल, परशु व वन यासारखी शस्त्र अस्त्रे व आयुध निर्माण करीत.या आयुधांच्या सहाय्याने देव व मानवांनी मानव जाती विरूध्द कार्य करणाऱ्या आसुर व दैत्य शक्तीचा वेळोवेळी नाश केला आहे. ऐतिहासिक काळातही अनेक लढाया व युध्दे झाली या युध्दात सैन्यासाठी लागणाऱ्या तलवारी, भाले, चिलखत(armour), ‘शिरस्त्राण, पोलादी मुकुट, तोफा इ.लोहशिल्पकारच बनवत. लोखंडीखांब, तोफा ची ओतीव कामे लोहार करित.आजही दिल्ली(Delhi) येथे कुतूबमिनार(Qutub Minar) जवळ उभा असलेला ‘विजयस्तंभ’ हा सहा टन वजनाचा १६०० वर्षापुर्वी बनविलेला ओतीव लोहस्तंभ ऊन,वारा,पाऊस व कडाक्याची थंडीला न जुमानता उभा आहे अजुनही तो गंजलेला नाही. अश्या ह्या मानवनिर्मित लोहस्तंभाच्या न गंजण्याच्या रहस्याचा आश्चर्याचा जगभरचे शास्त्रज्ञ शोध लावू शकलेले नाहीत.आजही शेतीसाठी लागणारी अवजारे नांगराचा फाळ,कुदळ,पावडी,विळे, खुरपे इ.  घिसाडी पांचाळ लोहारच बनवितात.आजच्या आधुनिक  काळात असलेल्या धातुशास्र अभियंता इतकेच धातूचे गुणधर्म व त्याचा वापर करण्याचे कौशल्य  त्यांच्याजवळ  होते व आहे. भटक्यातील अजुन एक जात शिख सिकलकर  हे धातुचे उत्तम शस्त्र तलवार, चाकू, सुरे बनविण्यात वाकबगार  होते. शिख  पंथातील(Sikhism) सर्व  गुरू व योध्दांना शिख सिकलकर हे शस्र बनवुन देत. कतारी सिकलकर हे लाकडी वस्तु बनविण्यात पारंगत आहेत. भटक्यातील  अजुन एक जात ओतारी हे तांबे, पितळ व कांस्य धातुपासून विविध  प्रकारच्या मुर्त्या,भांडी व वस्तू बनविण्यासाठी प्रसिध्द आहेत, पुर्वीच्या काळी धातुपासुन बनविलेल्या घंटाचा नाद कित्येक मैल अंतरापर्यंत ऐकु येतो, अश्या अनेक घंटा आजही भारतातल्या अनेक मंदिरात पाहायला मिळतात. दौलताबाद(Daulatabad) किल्ल्यावर असलेली गुजराथ(Gujarat) राज्यात बनलेली पंचधातुची “दुर्गा, तोफ” आजही पर्यटकांना व धातुशास्त्रज्ञांना कुतुहलाचा विषय आहे.  ओतारींना असलेले विविध धातु व ते वितळविण्याचे त्यातुन योग्य त्या साच्यानुसार वस्तु  मुर्ती  घडविण्याचे हे काम अभियांत्रिकीतच मोडते ना.

भटकेविमुक्तांतील आणखी एक शिल्पी(पाथरवट) पाषाण शिल्पकार(Stone sculptor) विश्वकर्मा ब्राम्हण हा विश्वकर्माच्या चवथा पुत्र यांचे वंशज वेदकाळापासुन यज्ञकरिता लागणारे यज्ञकुंडे, यज्ञवेदी दगडापासुन ,देवमुर्ती, उखा संभरण इ. तयार करीत असतात. देवमुर्ती दोन प्रकारच्या असतात.एक स्वयंसिध्द व दुसरी कृत्रिम बनविलेली, आजही संपुर्ण जगात आपल्या देशाची सनातन संस्कृती सर्वात पुरातन आहे.हिमालयातील काश्मिर(Kashmir) पासुन ते कन्याकुमारी(Kanyakumari) पर्यंत व द्वारकेपासुन ते जगन्नाथ पुरी(Jagannath Puri) पर्यंतच नव्हे तर ब्रम्हदेश, श्रिलंका, थायलंड,तिबेट इ.पुर्वेकडच्या देशातही आढळणारी विविध देवदेवतांची मंदिरे याची साक्ष आहे. गुजराथ(Gujarat), कच्छ,सौराष्ट्र(Saurashtra),ओरिसा(Orissa),उत्तरप्रदेश(Uttar Pradesh),मध्यप्रदेश(Madhya Pradesh),केरळ(Kerala), कर्नाटक(Karnataka),तामिळनाडु(Tamil Nadu),महाराष्ट्रात(Maharashtra) असलेली महादेवाची १२ ज्योर्तिलिंगाची मंदिरे,देवीची ५२ शक्तीपिठांची मंदिरे, जवळपास ९०० लेण्या, अनेक गडकोट किल्ले, भव्य राजप्रासाद राजवाडे, असंख्य मंदिरे ही सर्व पाथरवट पाषाणशिल्पकारांनी बनविलेली आहेत, त्यांच्या कलासंपन्नतेच्या व अभियांत्रिकी  ज्ञानाचा वारसा सांगणारी आहेत.पाथरवट पाषाणशिल्पकारांनी बनविलेली वेरुळ(Verul), अजिंठा(Ajanta), खजुराहो(Khajuraho), एलीफंटा(Elephanta) इ. लेण्यांमध्ये बनविलेली अप्रतिम जिवंत पाषाण शिल्पे, नक्षिकाम पाहून आजही आपलेच नाही तर जगभरच्या पर्यटकांचे मन थक्क होते.वेरूळचे कैलास लेणे तर “आधी कळस मग पाया”, तेही अखंड पाषाणात परफेक्ट लंब म्हणजे काटकोनात कोरलेले अप्रतिम जगातील सात आश्चर्यापैकी एक शिल्पकृती आहे. मदुराईचे मिनाक्षी मंदिरातील सहस्त्रस्तंभातील एक नादस्तंभ म्हणजे आणखी एक आश्चर्यच आहे. कोणार्कचे(Konark) सुर्य मंदिर असेच एकमेवाद्वितीय.ही सर्व प्रसिध्द मंदिरे,लेण्या जगभरातील आधुनिक इंजिनियर व आर्किटेक्ट ना अभ्यासाचा व हेवा वाटावा असा विषय आहेत.पाथरवट पाषाणशिल्पकारांचे प्रगती कार्य अनादी काळापासुन देवदिकांपासुन सुरू आहे.शिल्पी पाषाणशिल्पकार म्हणजेच पाथरवट या जगाच्या कल्याणासाठी या ‘भुतलावर विश्वकर्माच्या कृगेने कार्यरत आहे.या पाषाणशिल्पकार  पाथरवट  यांनी होयसल ,वाकाटक, राष्ट्रकुट,  यादव या राजवंशांच्या काळात तर अलिकडे छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj)  व राणाप्रतापाच्या काळात उभारलेले भुईकोट, डोंगरी किल्ले  तसेच जलदुर्ग हे त्यांच्यात असलेल्या  स्थापत्य  अभियांत्रिकीचे  ज्ञान दर्शवितात. पेशव्यांनी अभारलेला शनिवार वाडा देखील मोरारजी पाथरवट या गुजराती पाथरवटाने बनविल्याची नोंद आहे.अगदी इंग्रज  राजवटीतीत कसारा घाटात  रेल्वे साठी बोगदा  तयार करणारे पाथरवटांचे वंशज आजही  इगतपुरी व नाशिक पंचवटीत राहतात.आजही कसारच्या  ९ क्रमांकांच्या बोगद्यावर नानाजी गोपाळ पाथरवट यांचे नाव कोरलेले आढळून येते.

आजच्या अभियंता दिनी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादनासोबतच या सर्व  ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान समृध्द पारंपरिक कारागीर जातीतील ज्ञात अज्ञात अभियंत्याचे स्मरण ठेवले पाहिजे त्यांना त्यांचा सन्मान प्राप्त करून दिला पाहिजे यासाठी भटके विमुक्त विकास परीषद महाराष्ट्र प्रदेश सतत प्रयत्नशील आहे.

 

लेखक:- उध्दवराव विश्राम काळे,अध्यक्ष भटके-विमुक्त विकास  प्रतिष्ठान/परीषद महाराष्ट्र प्रदेश

( शिक्षण बि-टेक इलेक्ट्रॉनिक, उपकार्यकारी अभियंता नाशिक औष्णिक.वि.केंद्र,नाशिक)

 

माझ्या वस्तीवर गणपती आला..

मंकी बात…

Social Media