रंगभूमीवर पहिल्यांदाच वर्तमान राजकारणाचा पडदा उघडणार!

मुंबई  : आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला बघायला मिळाले आहे, मात्र पहिल्यांदाच रंगमंचावर ” मला काही सांगायचंय!” या नावाने दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे(Eknath Sambhaji Shinde) हे आपल्या मनातील गोष्ट रंगभूमीवर घेऊन येत आहेत. दोन वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर धर्मवीर (धर्मवीर)आला आणि राजकारणाची समीकरणे बदलली आता लवकरच धर्मवीर २ येतो आहे.

मात्र आजपर्यंत राजकारणापासून वेगळा राहिलेला विषय रंगमंचावर मला काही सांगायचंय! या नावाचे नाटकाव्दारे लवकरच येत असून आपल्या मनातील भावना लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेत या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे. सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळाल्यास येत्या दोन दिवसात या नाटकाची घोषणा होणार  असल्याचे समजत आहे. दरम्यान हे नाटक एकपात्री असून, नेमके एकनाथ शिंदे या नाटकाद्वारे कोणता बॉम्ब फोडणार आहेत याबद्दलची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.
प्रेरणा कला संस्था निर्मित, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ व संग्राम समेळ याचे सादरीकरण करणार आहेत.
Social Media