अमेरिका स्थित शिवप्रेमी परिवाराचे लॅास एंजलिस येथील प्रतिनिधी विजय पाटील यांनी घेतली नीलम गोर्हे यांची भेट

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) हे  विश्वातील एक महान विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते. जगभरात विशेषत: अमेरिका सारख्या मोठ्या देशात महाराष्ट्राचे सण व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन याप्रसंगी उपसभापती व शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe)यांनी केले.
अमेरिकेत स्थायिक झालेले  विजय पाटील हे श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार हे व्यासपीठ तयार केले आहे. या व्यासपीठाने जगभरातील १९० देशात व २५० शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जपणुक केली आहे. गेली पंचवीस वर्षे अमेरिकेतील लाँस ऐन्जिलस (Las Angelus)या शहरात विजय पाटील राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकावर आधारित  आंतरराष्ट्रीय स्तरावरती २०२३ कार्यक्रम साजरा केला होता. महाराष्ट्र संस्कृती परंपरा आणि शिवरायांचे शौर्य व त्यांची गाथा या कार्यक्रमात  सादर केली होती.
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केले आहे. या पुस्तकाची प्रत  महाराष्ट्र  विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलम गोऱ्हे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांना दिली.
 विजय पाटील यांच्या या अनोख्या व गौरवास्पद कार्याचे कौतुक डाँ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले व मुलींच्या सक्षमीकरणा बाबत ही काम करावे असे सांगितले. यावेळी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विजय पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या या कार्यक्रमासाठी घेतलेल्या परिश्रमाचे अभिनंदन केले.
Social Media