कल्याण – विधानसभा(Kalyan – Assembly) जस जश्या जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील वरिष्ठ पदावरील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे , ही गटबाजी वेळीच रोखा अन्यथा आगामी विधानसभा निवडणूकीत या गटबाजीला पक्षाची मोठी किंमत मोजावी लागेल अशा आशयाचे लेखी निवेदन कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील ६ विभाग प्रमुखांनी एकत्रीतपणे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना दिले असल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कल्याण पूर्वेतील शिवसेना पक्षात अंतर्गत गटबाजीला उधाण आल्याचे स्पष्ट होत आहे .
शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील विभाग प्रमुखांचे उध्दव ठाकरे यांना लेखी निवेदन !
कल्याण पूर्व विधानसभेमधील सर्व विभागप्रमुखांनी उध्दव ठाकरे यांना एका लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे की , सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. वरीष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळे गट निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आले. त्यामुळे नेमके कोणत्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश ऐकावे याबबात पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. काही वरिष्ठ पदाधिकारी ठराविक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यक्रम आयोजित करतात आणि वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करुन जे पदाधिकारी वरिष्ठांसोबत कार्यक्रमात सहभागी होतात , त्यांच्यावर अमुक गटाचा कार्यकर्ता असा ठप्पा लावला जात आहे.
आपल्या नेतृत्वात आम्ही सर्व पक्षवाढीसाठी सतत कार्यरत असतो. पक्षवाढीसाठी जे काही करता येईल त्याची तयारी आमच्या सारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे आणि ती कायम राहील. परंतु आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक गटबाजीमुळे कल्याण पूर्व मध्ये येणाऱ्या निवडणूकीत मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे २४ ऑगस्ट रोजी पक्ष आदेशाने झालेला मुक पद्धतीने केलेला निषेध मोर्चा, हा निषेध मोर्चा कल्याण पूर्व काटेमानिवली नाका आणि श्रीराम चौक उल्हासनगर येथे झाला. यावेळी आमच्यासारख्या सर्वसाधारण पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जेथे सोयीस्कर किंवा जवळ वाटले त्याठिकाणी त्यांनी हजेरी लावून मोर्चा यशस्वी केला. परंतु वरिष्ठांकडून मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांवर हा या गटाचा आणि तो त्या गटाचा कार्यकर्ता असल्याचा ठपका लावण्यात आला आहे .
निवेदनात पुणे म्हटले आहे की ,
अशा प्रकारच्या गटबाजीमुळे पक्ष हिताच्या दृष्टीकोनातून फक्त पक्ष निष्ठा कळते. शिवसेना(Shiv Sena) पक्ष हा आदेशावर आणि पक्ष शिस्तीवर चालतो परंतु सध्या सुरु असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे पक्ष वाढीसाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
१४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघामधील विभागप्रमुखांना विश्वासात न घेता बरेच निर्णय घेतले जातात. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी कोणत्याही उमेदवाराला मिळाली तरी आमचा फक्त उमेदवार मशाल असेल ही ग्वाही या निमित्ताने आम्ही सर्व विभागप्रमुख आपणांस देत आहोत. परंतु अंतर्गत राजकारणामुळे आपल्या पक्षाला निवडणुकीत मोठी किमंत मोजावी लागेल त्यामुळे यापुढील कोणत्याही निवडणुकीत कृपया उमेदवार निवडीच्या वेळी सर्व विभागप्रमुखांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर सर्वश्री राजेंद्र गायकवाड, कीरण निचळ , गणपत घुगे , संजय गुजर , जगदीश तरे , सत्यवान खेडेकर , आत्माराम डिगे , नितीन राणे या विभाग प्रमुखांच्या संपर्क क्रमांकासह स्वाक्षऱ्या