मंकी बात…

पळवापळवी केल्याने कुठला पक्ष, विचार संपत नसतो हेच शिवरायांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले!

Amit-Shah

विधानसभांच्या निवडणुका २०२४(Assembly Elections 2024)मध्ये होणार की २०२५मध्ये होणार? याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगा(Central Election Commission)ने त्यासाठी चाचपणीचा दौरा मुंबईत करत पंचतारांकीत हॉटेलातून बैठका घेवून आपल्या बदललेल्या कार्यशैलीचा प्रत्य़य दिला. सर्व पक्षांच्या नेत्यांना अधिकृतपणे भेटून चर्चा करतानाच काही खास नेत्यांच्या (गुपचूप?) भेटीगाठी देखील आयोगाच्या आयुक्तांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामागेही निवडणूका(Elections) पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडाव्या हाच उदात्त हेतू असावा यावर उगाच शंका घेणे योग्य नाही! आयोगाच्या पत्रकार परिषदेतही प्रश्न आणि उत्तर असे न करता आयुक्तांनी चार पाच प्रश्न एकामागे एक ऐकून घेत त्यांना सरसकट उत्तरे देण्याची नवी शैली दाखवून दिल्याने मुंबईकर पत्रकार हरखून गेल्याचे दिसले. किमान पंतप्रधानानी देखील याच प्रकारे आता तरी जाता जाता पत्रकार परिषदा आयोगाच्या या नव्या पध्दतीने घ्यायला हरकत नसावी. असो.

 

छत्रपती-शिवाजी-महाराज
तर मागील पंधरा दिवसात महाराष्ट्रात ब-याच घडामोडी झाल्या. अगदी ‘न भूतो न भविष्यती’ अश्या या घटनांमध्ये सामान्य मराठी किंवा महाराष्ट्राच्या नागरिकांना विचार करायला भाग पाडले आहे. या राज्यात छत्रपती शिवरायांच्या काळात गुन्हेगाराला त्याचा गुन्हा शाबीत झाल्यानंतर कठोर शासन केले जात असे. मात्र सध्या छत्रपतींचे रोज नाव घेत सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांनी आपल्या बगलबच्च्यांच्या कुकर्माची भलीमोठी यादी निवडणूकांच्या ऐन धामधुमीत बाहेर पडेल म्हणून कायद्याच्या सा-या प्रक्रिया बाजुला ठेवत तालीबानी पध्दतीने एका आरोपीचा काटा काढावा? त्याचे म्हणणे न्यायालयात नोंदवले जाण्यापूर्वीच त्याला यमसदनी पाठवावे. आणि पुन्हा कसा न्याय दिला की नाही? अशी विचारणा करावी हे सारे सामान्य माणसाच्या वकुबाच्या आणि बुध्दीपलिकडेच आहे असे म्हणावे लागते.
मात्र उच्च न्यायालयाने त्यावर काही प्रश्न उपस्थित करत पोलीसांच्या या प्रकारच्या वागण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर काही सजग कायद्याचे तारणहार सर्वोच्च न्यायालयातही अश्या प्रकारच्या घटनेबाबत संविधानीक मानवी हक्कांच्या रक्षणासाठी पोहोचले आहेत. त्यावर आता न्यायालयात सुनावणी होणार आहे म्हणून तूर्तास या प्रकाराला बाजुला ठेवून राजकीय घडामोडींचा अंदाज घेवूया!

 

Monkey-baat
महाराष्ट्राच्या (Maharashtra)जनमानसात सध्या लाडक्या बहिणींच्या भल्याच्या योजनेतून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचारकी पध्दतीने हे सरकार कसे सामान्य महिलांच्या काळजीने तिजोरी लुटायलाही मागेपुढे पाहत नाही ते दाखवून देण्याचा अट्टाहास सुरू आहे. त्यासाठी राज्याच्या संपूर्ण अर्थसंकल्पाची मोडतोड करण्यात येत असून अन्य विभागांचे निधी वळविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रातील भाजपच्या नेत्यांच्या सूचनेवरून हे सारे होत असून, अमीत शहा यांनी सध्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची सारी सूत्र हाती घेतली आहेत. केवळ भाजपच नाहीतर अगदी टिम ए बी सी डी. . .  झेड पर्यंत सा-यांना कामे वाटून देत कामाला लावले आहे. त्यात मनसे वंचीत तिसरी आघाडी इत्यादी सा-या पक्ष आणि नेत्याच्या नव्या नव्या भुमिका समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही मनसेच्या नेत्यांचे अवकाळी दौरे होताना दिसत आहेत. तर वंचितच्या नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या दिशेने टिका टिपण्या केल्या जात आहेत. तिसरी आघाडी नावाने नवा तंबू या जत्रेत आला असून त्यात बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी अश्या मंडळीना ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ या अभंगासारखे एका टोपल्यात बसविण्याचा प्रयत्न ‘आका’ करताना दिसत आहेत. थोडक्यात काय तर. . .  जेणेकरून भाजप विरोधात जाणारी मते विभागली जावी असा सारा प्रयत्न होत आहे.

narendra modi
कारण महाराष्ट्र (महाराष्ट्र)केंद्रातील सत्ताधारी वरिष्ठ नेत्यांसाठी कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाने लोकसभा निवडणूक निक्कालाच्या पार्श्वभुमीवर अनुशासनाचा आणि वर्चस्वाचा बडगा उगारला आहे. केंद्रात दिवाळीनंतर मोदी सरकार राहणार की नाही? हे महाराष्ट्रात महायुती पुन्हा सत्तेवर येणार की नाही? यावर अवलंबून आहे. त्याशिवाय भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? या गहन प्रश्नांवर सध्या भाजप आणि संघ यांच्यात घमासान सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रातील नेत्यांनी विदर्भांपासून मुंबईपर्यंत सा-या राज्यातील निवडणुक हाती घेतली असून प्रमुख सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जाणत्या नेत्यांनाही दिल्ली बोले तैसे चाले झाल्यामुळे काहीच बोलता येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

दुसरीकडे धनगर आरक्षण(Dhangar reservation), मराठा आरक्षण(Maratha reservation), आणि ओबीसी आरक्षणच्या(OBC reservation) मुद्यावर जनतेच्या आंदोलनांच्या माध्यमातून राजकीय संभ्रमाची स्थिती गडद होत चालली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यातील किमान शंभर मतदारसंघ अडचणीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सरकारच्या प्रतिमेला धक्का लागणा-या घटनांची मालिका अव्याहतपणे सुरू आहे. बदलापूर(Badlapur) बालिका अत्याचार प्रकरणात संस्थाचालक महिना झाला तरी समोर येत नसताना ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीसांनी संशयास्पद स्थितीत एनकाऊंटर केल्याने या विषयाची उकल होण्याऐवजी अधिक त्रांगडे होण्याची चिन्ह आहेत. बदलापूर शहरात मात्र आरोपीचा गुन्हा अद्याप न्यायालयात सिध्द व्हायचा बाकी असतानाच काही अर्धवट लोकांनी जल्लोष करत फटाके वाजविण्याचा मुर्खपणा केल्याचे पहायला मिळाले. पकडलेला आरोपी हा एकमेव गुन्हेगार असावा असा गैरसमज सा-या राज्यात व्हावा आणि फरार असलेल्या अन्य संबंधिताना या प्रकरणाचा तपास बंद होवून दिलासा मिळावा असा हेतू या जल्लोषामागे असावा असेही सांगण्यात येत आहे. दुसरी घटना मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणात पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते आणि त्याची योग्य देखभाल करण्यात आली नाही असा निष्कर्ष तपास समितीच्या अहवालात काढण्यात आल्याने या घाईने उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या कामाबद्दल दोषी कोण? या प्रश्नाला वाचा फुटली आहे. निवडणूक प्रचारात आता विरोधक हा प्रश्न विचारणार असून राज्यात सत्ताधारी पक्षांला त्यामुळे अनुकूल स्थिती राहण्याची चिन्हे नाहीत.

त्यामुळे विधानसभा निवडणूक(Assembly elections) तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा आणि दरम्यान सरकारचे प्रतिमावर्धन तसेच विकास कामांचे भुमीपूजन उदघाटन असे कार्यक्रम करून वातावरण निर्मिती करता येईल का असा प्रयत्न सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चाचपणी देखील करण्यात आली असून निवडणुकांचा कार्यक्रम आता नेमका केंव्हा लागणार याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.

 महाविकास-आघाडी
मात्र राज्यात राजकीय हवामानाचा अंदाज घेत इकडून तिकडे बेडूकउड्या सुरू झाल्या असून सध्या महाविकास आघाडीकडे येणा-यांचे प्रमाण त्यामानाने जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजीत पवार या दोन पक्षांमध्ये सध्या चिन्ह आणि नावाचा वाद देखील जोमाने सुरू असून जागावाटपांचा झिम्मा देखील सगळ्या युत्या आघाड्यांमध्ये रोजच सुरू आहे. त्यातही अडचण होण्याची शक्यता असलेल्यांना तिसरी आघाडी मनसे वंचीत अश्या अन्य पर्यायांसोबत अपक्ष निवडणूक लढण्याचा पर्याय देखील खुला असल्याने बहुरंगी बहुढंगी निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. तर शिवसेना उध्दव आणि शिवसेना यांच्यातही सध्या धर्मवीर २च्या निमित्ताने जुन्या राजकीय वादांना नव्याने फोडणी देण्याचा प्रयत्न करतानाच २०२२मध्ये जे काही पक्षफुटीच्या वेळी झाले त्याला हिंदुत्वाचा राजकीय मुलामा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एवंच राज्यातील जनता जनार्दन मुर्ख असल्याचे समजून राजकीय पक्ष त्यांचे नेते आपापल्या वकुबानुसार पतंगबाजी करताना दिसत आहेत. मात्र लोकसभा निवडणुक जशी एकतर्फी लढवली गेली तशी शक्यता आता विधानसभा निवडणुकीत राहिली नसून नव्या पिढीच्या नव्या नेत्यांचा उदय या निमित्ताने होताना दिसत आहे. माणसे तयार करणारी फँक्टरी असा लौकीक असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पूर्वीचे नेते सोडून गेलेतरी मोट्या प्रमाणात नव्या इच्छुकांची रांग लागली आहे. संपले संपले म्हटले गेलेल्या पक्षांचे नेते जास्तीच्या जागा मिळाव्या म्हणून आग्रह धरताना दिसत आहेत. त्यामुळे आमदार पळवापळवी केल्याने कुठला पक्ष संपत नसतो हेच शिवरायांच्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. चुकीचा समज करून घेत सुरतेच्या लुटीच्या बदल्यासाठी राज्यातील कमजोर नेत्यांच्या एका वर्गाला हाताशी धरून राज्याची लूट करणारांना यावेळी सामान्य मराठी जनता कायमचा धडा देण्याच्या मनस्थितीत आहे हे समजण्यासाठी वेळेवर निवडणूका होणे महत्वाचे आहे. त्या साठी सध्या महाराष्ट्र वाट पहात आहे. . .

 

किशोर आपटे

(राजकीय विश्लेषक)

 

मंकी बात…

मंकी बात…

Social Media