कोल्हापुर : कॉँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) कोल्हापुरात(Kolhapur) आले त्यावेळी भाजपा कार्यकर्ते सुद्धा राहुल गांधी(Rahul Gandhi) ज्या मार्गावरुन जाणार तिथे जाण्यासाठी आक्रमक झाले . पोलीसांकडून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) जवळपास १४ वर्षांनी कोल्हापुरमध्ये आले. राहुल गांधी यांनी कोल्हापुरमध्ये पाय ठेवताच भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले . राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच असा या भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार होता शनिवारी सकाळी राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल झाले. एका सामान्य टेम्पो चालकाच्या घरी राहुल गांधी यांनी चहापान केलं. राहुल गांधी कोल्हापुरात(Kolhapur) आल्यानंतर भाजपा कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन जमले.
राहुल गांधी यांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता, त्या दिशेने काळे झेंडे दाखवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते धावत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भाजपा कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. राहुल गांधी अलीकडे आरक्षण आणि संविधानासंदर्भात काही वक्तव्य केली आहेत. त्या विरोधात निषेध म्हणून आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार असं भाजपा कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.