नवी दिल्ली : ‘विस्तारा’ आजपासून बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमानांमध्ये वाय-फाय सेवा देईल, जी सध्या दिल्ली-लंडन उड्डाणांसाठी वापरली जात आहे. खासगी विमान कंपनीने गुरुवारी ही माहिती दिली. एअरलाइन्सने म्हटले आहे की, “प्रारंभिक ऑफर म्हणून मर्यादित कालावधीसाठी सर्व विस्तारा ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध होईल.”
विस्तारा विमानातील वाय-फाय सेवा देणारी पहिली भारतीय विमान कंपनी आहे. एअरलाइन्सच्या ताफ्यात दोन ड्रीमलाइनर विमान असून ती दोन्ही सध्या दिल्ली-लंडन उड्डाणे चालविण्यासाठी वापरली जात आहेत. ते म्हणाले, “मर्यादित कालावधीसाठी विनामूल्य सेवा देताना, सेवा आणखी सुधारण्यासाठी विस्तारा ग्राहकांच्या अनुभवांवर आधारित सिस्टम फंक्शनॅलिटी आणि प्रतिक्रियेबाबत माहिती गोळा करेल.”
एअरलाइन्सने सांगितले की, ते योग्य वेळी वायफाय सेवांच्या शुल्काच्या योजना जाहीर करतील. कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे 23 मार्चपासून पुढे ढकलण्यात आली आहेत. तसेच, वंदे भारत मिशन अंतर्गत आणि जुलैपासून भारत आणि अन्य देशांदरम्यान जुलैपासून देशात विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहेत.