निवडणूकपूर्वीच मुंबईत कायदा सुव्यवस्थेला आव्हान!

 मुंबई  : अजित पवार(Ajit Pawar) गटाचे वांद्रे (Bandra)येथील नेते माजी र‍ाज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए(SRA) प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital)दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर  १२ ऑक्टोबरच्या रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली. तसेच अभिनेता संजय दत्त ही लिलावती रुग्णालयात धावला. राष्ट्रवादीचे अनेक नेतेही लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबाराचा प्रकार घडला.
Social Media