संख्याबळ आणि पाठबळ त्यासाठीच ही पळापळ!

लोकसभा २०२४ नंतर आता उशीराने जाहिर झालेल्या विधानसभा २०२४च्या(Assembly Elections 2024) उमेदवार निवडीचा घोळ सर्वच पक्षांच्या नेत्यांना अडचणीचा आणि भविष्यातील वाटचालीसाठी पेचात टाकणारा ठरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तर संभाव्य सत्ताप्राप्तीच्या कल्पनेनेच इतकी भाऊगर्दी झाली आहे की, त्यांना नाही कुणाला म्हणावे असा प्रश्न पडला आहे. गंमत म्हणजे संपले म्हणून ज्या पक्षांबद्दल सांगण्यात येते ते हे कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) यांचे पक्ष आता त्यांच्याकडे अन्य पक्षांतून येण्यासाठी इच्छुकांना प्रवेश देण्यास इच्छुक नाहीत अशी स्थिती आहे म्हणे!

त्यातल्या त्यात शरद पवार (Sharad Pawar)यांच्या नेमस्त अनुभवी राजकीय धोरणा नुसार फार सोस न करता नेमक्या जागा पदरात पाडून घेत त्यात जास्तीत जास्त विजयी कश्या करता येतील? असा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वत:च्या किमान साठ ते पासष्ट जागा जिंकून येतील याशिवाय किमान दहा ते बारा अपक्ष आणि निवडणुकीनंतर अजित पवार यांचा पक्ष सोबत आला तर पवार यांच्या या संख्याबळाला पस्तीस ते चाळीस आणखी आमदारांचा पाठिंबा मिळवून ते मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसच्या वाट्याला शंभर जागा आल्या तरी विदर्भातील ६२ आणि मराठवाड्यातील ४७ जागा वगळता पश्चिम महाराष्ट्र(Western Maharashtra), उत्तर महाराष्ट्र(North Maharashtra), कोकण(Konkan), मुंबई अश्या भागातून कॉंग्रेसच्या २५ जागांच्या आसपास जागा येतील तर विदर्भ(Vidarbha) आणि मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका भाजप प्रमाणे कॉंग्रेसला बसण्याची शक्यता लक्षात घेता शंभर पैकी किमान ५० जागा विजयी  होण्याची शक्यता नाही. म्हणजे विदर्भ – मराठवाड्यात ३५-४० जागा कॉंग्रेसने घेतल्या तरी त्यांचे संख्याबळ ५० ते ७० दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

शिवसेना उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या पक्षाला ज्या ९० – ९५ जागा अपेक्षीत आहेत त्या नेहमीप्रमाणे कोकण, मुंबई उ. महाराष्ट्र, प.महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आहेत. पण नेमके त्यांच्याप्रमाणे शिंदे यांच्याकडे देखील त्यात जागांवर दावा केला जात असल्याने आणि कॉंग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांसोबत या दोन्ही शिवसेनांची जागावाटप असल्याने त्यांच्याकडून किती मदत किंवा रसद मिळणार आहे यावर यातील कोणत्या जागा कोणत्या सेनेला जातील याचे निकाल अपेक्षीत आहेत. मात्र शिंदे यांचा स्वभाव आणि राजकीय महत्वाकांक्षा पाहता ते देखील ठाकरेंच्या तुलनेत अधिक जोर लावणार हे उघड आहे त्यामुळे  ठाकरेंच्या शिवसेनेच्या जास्तीच्या जागा थोड्याफार मतांनी का होईना शिंदेना जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष मिळून ज्या काही ६० ते ६५ जागा विजयी होतील त्यात शिंदे आणि ठारे यांचे संख्याबळ २५ ते ४० च्या आसपास राहणार आहे त्यात कुणाला जास्त जागा मिळतात ते निकालानंतर स्पष्ट होणार आहे.  बंडखोर आणि अपक्षांच्या या निवडणूकीतील संख्येमुळे अनेक जागांवर अधिकृत पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सारख्या पक्षांच्या समोर देखील कधी नव्हे ते इच्छुकांचे थवे थोपविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पक्षांला विदर्भात कॉंग्रेस समोर लोकसभेत टिकाव धरता आला नाही तरी यावेळी ६२ पैकी किमान १५ ते २० जागा भाजप घेवून जावू शकते आणि कॉंग्रेसच्या हाराकिरी राजकारणाने उचल खाल्ली तर ही संख्या२५ ते ३० पर्यत जावू शकते असे जाणकार मानतात. कॉंग्रेसला सध्या लोकसभा निवडणूकीत ज्या काही ११ लोकसभा होत्या त्यातील ८० टक्के जागा मिळाल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट(Strike rate) पाहता ६२मध्ये ४० किंवा त्यापेक्षा चार पाच जास्त जागा मिळण्याची अपेक्षा विदर्भात पक्षाला आहे. मात्र प्रत्यक्षात शिवसेना ठाकरे पक्षांसोबतचा वाद वाढत गेला तर त्या पक्षांचे पाठबळ मतदानात घेण्यात अडचणी येतील, त्यामुळे कॉंग्रेसच्या २५-३० च्या आसपास जागा विदर्भात तर सात ते नऊ मराठवाड्यात अपेक्षीत धरल्या जात आहेत अन्य राज्यभरातून २५ जागा पक्षाला मिळाल्या तर ६० ते ७० च्या आसपास पक्षाला संख्याबळ मिळू शकेल.

भाजपला मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता मराठवाड्यात पक्ष दहा जागा पर्यंत अपेक्षीत जागाही मिळवण्याची शक्यता नाही. तर विदर्भात २० ते २५ जागा अपेक्षीत आहेत. याशिवाय मुंबई कोकण उ महाराष्ट्र प महाराष्ट्र या भागातून २५ ते ३० जागा अपेक्षीत धरल्या जात आहेत. म्हणजे १०० पार असलेल्या भाजपचे संख्याबळ यावेळी ५० ते ७० च्या आसपास येवुन थांबण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारे प्रमुख राजकीय पक्षांच्या संख्याबळाचा विचार केला तर ज्याच्याकडे शंभरीच्या आसपास संख्याबळ मिळेल त्यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवाय या खेळात त्यांना पाठबळ देणारे नवे समिकरण तयार झाले तर राज्यात यावेळी नवा पुलोद सारखा प्रयोग देखील घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

किशोर आपटे

(लेखक व राजकीय विश्लेषक)

 

उमेदवारीच्या वादात नातेवाईक, परिवार वाद आणि सगेसोयरे

Social Media