कल्याण : कल्याण पूर्व (Kalyan East)विधानसभा मतदार संघात महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे , त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून
उमेदवार निश्चितीसाठी मातोश्री वर गेली ३ दिवस मॅरेथॉन बैठकावर बैठका झाल्या पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या मतदार संघात उल्हासनगर स्थित धनंजय बोडारे यांना उमेदवारीचा ए बी फार्म देवून त्यांना या मतदार संघातील निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे . धनंजय बोडारे यांच्या या निवडी बद्दल पक्षातील कार्यकर्त्यामध्ये थोडी खुशी थोडा गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणूक(Lok Sabha elections) पार पडल्या नंतर हा मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पारंपारिक पद्धतीने उबाठा गटाकडेच रहाणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर या मतदार संघातून पक्षाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालंडे , जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच माजी महापौर रमेश जाधव हे उमेदवारी साठी प्रमुख दावेदार होते . परंतु मातोश्री वरील तिकीट वाटपाबाबत बैठका सुरु झाल्यानंतर कल्याण पूर्वेतून ऐन वेळी पक्षाकडून तिकीट मिळावे म्हणून अन्य पक्षाचे तीन ते चार इच्छुक मातोश्रीवर ठाण मांडून होते . परंतु पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षातीलच निष्ठावान आणि सक्षम इच्छुकालाच उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट केले.
त्या नुसार सन २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या एकूण मतांच्या सुमारे ३२ टक्के मिळविलेले आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले धनंजय बोडारे यांना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वःता ए बी फार्म देवून उमेदवारी दिली आहे .
माजी महापौर रमेश जाधव यांनी कल्याण पूर्व निवासी इच्छुकाला उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला होता परंतु या महत्वाच्या मुद्याचा विचार न करता उल्हासनगर स्थित इच्छुक उमेदवाराला उमेदवारी दिली गेली असल्याने कल्याण पूर्वेतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजिचा सुरु आहे .
यावेळी कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील यांचे सह कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे , जेष्ठ नेते खासदार संजय राऊत , आमदार मिलींद नार्वेकर , अल्पेश भोईर हे उपस्थित होते .