मुंबईत 144 कलम कोरोनामुळे नव्हे, मराठा आंदोलनामुळेच : चंद्रकांत पाटील यांची टिका

मुंबई :  “मुंबईतील १४४ कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.  सरकारला सल्ला देताना पाटील म्हणाले की, “कलम लावून आंदोलने दाबता येत नाहीत. तातडीने निर्णय घेवून पंधराशे कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा”, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईत ३०सप्टेंबरपर्यंत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मराठा समाजासाठी घोषित करा. यावर्षी ६४२अभ्यासक्रमांना निम्मे शुल्क सरकार भरणार हे घोषित करा, दहा लाखाचे कर्ज घेणाऱ्यांचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरते, ती संख्या वाढवा. व्याजाची तरतूद करा”, अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे. “गेले तीन महिने व्याज भरलेली परतावा बँकेच्या खात्यात झालीच नाही आहे. सारथीची पूर्ण वाट लावलेली आहे. ती पुर्ववत करा. अजित पवार हे धडाकेबाज नेते आहेत.

सरकारमध्ये मोठी समस्या निर्णय लवकर होत नाहीत ही आहे. अजित पवारांकडे हा विषय आल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत”, असेही ते म्हणाले.

Social Media