‘सिंघम अगेन’ची बॉक्स ऑफिसवर दमछाक !

दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित दिग्दर्शित ‘सिंघम अगेन'(Singham again) चित्रपट रिलीज झाला. चित्रपट बक्कळ कमाई करेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांसोबतच ट्रेड अॅनालिस्ट यांनाही होती. मात्र, सध्या चित्र उलटेच दिसत आहे. ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या १०व्या दिवसापर्यंत केवळ २०० कोटी कमावले. सूत्रांनुसार, या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ १६१ कोटी कमावले, दुसऱ्या आठवड्यात २९ कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत जवळपास २०० कोटींची कमाई केली आहे. तज्ज्ञांनुसार, चित्रपटाने ७०० कोटी रुपयांची तरी कमाई करणे अपेक्षित आहे.

danger-lanka

‘डेंजर लंका’ ठरतोय फ्लॉपचे कारण?

या चित्रपटाच्या निमित्ताने अर्जुन कपूरने प्रथमच खलनायक साकारत ‘डेंजर लंका’ ही व्यक्तिरेखा रंगवली आहे. अर्जुनला खलनायकाची ऑफर देऊन खरे तर दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीने रिस्कच घेतली होती. त्याचे पडसाद बॉक्स ऑफिसवर उमटत असल्याची बी-टाऊनमध्ये चर्चा सुरू आहे. अर्जुनच्या भूमिकेमुळे चित्रपट फ्लॉप ठरत असल्याचे बोलले जात आहे.

अजय-रोहितचा पुन्हा ‘गोलमाल’

घम सीरिजमधील तिसरा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणारी रोहित शेट्टी आणि अजय देवगण ही जोडी त्यांच्या आणखी एका गाजलेल्या सिरीजमधील चित्रपटाचा पुढील भाग बनवणार आहे. रोहित आणि अजय ‘गोलमाल’ चित्रपटांच्या सिरीजमधील पाचव्या भागासाठी सज्ज झाले आहेत. २०१६ मध्ये ‘गोलमाल फन अनलिमिटेड’ (Golmaal Fun Unlimited)या नावाने आलेला या सिरीजमधील पहिला भाग यशस्वी झाल्यानंतर २००८ मध्ये ‘गोलमाल रिटन्र्स’ या नावाने याचा सिक्वेल आला होता. त्यानंतर २०१० मध्ये ‘गोलमाल ३’ आणि २०१७ मध्ये ‘गोलमाल अगेन’ (Golmaal again)हे चित्रपट आले. आता अजय- रोहितला ‘गोलमाल ५’चे वेध लागले आहेत. या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘गोलमाल’मधील धमाल अनुभवायला मिळणार आहे.

 

शाहरुखच्या 59 व्या वाढदिवसासाठी खास आयोजन, 250 आमंत्रणे आणि एक घोषणा विशेष असू शकते

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *