सोलापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची जागा राखण्यासाठी, तर आघाडीची वाढविण्यासाठी धडपड

पाच मतदारसंघांत जोर : अपक्षांची लढतही महत्त्वाची

मुंबई : सोलापूर(solapur) जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना महाविकासभाधाहीच्या उमेदवारांनी आव्हान दिले आहे. मागील निवडणुकीत महायुतीकडे १०, तर मविआवाडे केवळ एकच आमदार राहिला आता महाआघाडीने पाच मतदारसंघ जिंकण्यासाठी जोर लावला आहे. शहर उत्तर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख राचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांना शरद पवार (Sharad Pawar)स्टाचे महेश कोठे, भाजपच्या बंडखोर शोभा बनशेट्टी यांनी आव्हान दिले आहे. लोकसभेला जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला. मात्र, या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य होते. त्यामुळे कोठे, बनशेट्टी हे दोघे देशमुखांना कसे रोखणार याकडे लक्ष आहे. शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येवून काँग्रेसच्या खासदार दिन आल्या आता प्रतीकत आहेत काँग्रेसचा उमेदवार निश्चित करताना वाद झाले. आता या मतदारसंघात भाजपचे देवेंद्र कोठे, एमआयएमचे फारुख शाब्दी, काँग्रेसचे चेतन  नरोटे अशी तिरंगी लढाई आहे. या लढाईला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून सध्या कोठे आणि शाब्दी अशी प्रमुख लढाई दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे ही लढाई बदलण्यात यशस्वी होतात का, याची उत्सुकता आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे

आमदार सुभाष देशमुख तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांना उद्धवसेनेचे अमर पाटील, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी, प्रहार जनशक्ती पक्षाचे बाबा मिस्त्री यांनी आव्हान दिले आहे. येथे महाआघाडीत बिधाडी झाली असून, काँग्रेसचे काही नेते काडादीसोबत तर काही पाटलांसोबत आहेत. तीन विरोधकांच्या मतविभाजनाचा देशमुखांना फायदा होतो की आघाडीचे नेते मते फिरविण्यात यशस्वी

होतात, याकडे लक्ष आहे. अक्कलकोटमध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांना आव्हान दिले आहे. बार्शीमध्ये शिंदेसेनेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याविरोधात उद्धवसेनेचे दिलीप सोपल यांनी चुरस निर्माण केली आहे. या मतदारसंघात जररांगे-पाटील फैक्टर, जिल्हा बकिचा बेकायदेशीर कर्जवाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. माढा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे  यांनी पुत्र रणजितसिंह यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अभिजित पाटील, अजित पवार गटाच्या मीनल साठे यांची लढाई सुरू आहे. अनेक वर्षांनंतर या मतदारसंघात चुरशीची लढाई होत आहे. करमाळ्यात अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार संजयमामा रिदि पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांना शरद पवार गटाचे नारायण पाटील, शिंदसेनेचे दिग्विजय बागल यांचे आव्हान आहे.

मागील निवडणुकीत पाटील, बागल गटाच्या मतविभाजनाचा संजयमामांना फायदा झाला होता, यंदा मोहिते-पाटील गटाने मतविभाजन रोखण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे. सांगोल्यात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना शेकापचे बाबासाहेब देशमुख, उद्धवसेनेचे दीपक साळुंखे यांनी आव्हान दिले आहे. मागील निवडणुकीत साळुंखे गट शहाजी बापूंसोबत होता. शेकापच्या देशमुखांसाठी मोहिते-पाटील गटाने ताकद लावली आहे.

मोहोळ या राखीव मतदारसंघातून अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने, शरद पवार गटाकडून राजू खरे, शरद पवार गटाचे बंडखोर संजय क्षीरसागर अशी तिरंगी सुरु लढाई आहे. हा मतदारसंघ माजी आमदार राजन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राजन पाटील यांच्या तालुक्यातील बहुतांश विरोधकांनी खरे यांच्या मागे लावलेली ताकद कामाला येते का, याचे जिल्ह्याला औत्सुक्य आहे.

माळशिरस हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते- पाटीलांनी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाकडून उत्तम आनकर उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला सातपूर्तेचा सोलापूर मतदारसंघातून पराभव झाला होता. मोहिते-पाटलांनी त्यांच्या विरोधात रान उठवले होते. लोकसभेच्या निकालानंतर मोहिते-पाटील गटाचा उत्साह वाढलेला आहे. पंढरपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार ठरविताना आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात वाद झाला. या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढून पुन्हा आमदार समाधान आवताडे रिंगणात उतरवले. त्यामुळे ही लढाई भाजपसाठी महत्त्वाची मानली जाते महाजाघाडीचा उमेदवार ठरविताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये वाद झाले. या

वेळेवर डीपी उपलखा न होणे. सोलापूर शहरात पाच दिवसाआ पुरवठा, विमानतळ तयार होऊना विमानसेवा सुरू न झाल्याची खंत जिल्हा परिषद, महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या काळा मूलभूत सोयीसुविधा मिळविण्यात हाल होत असल्याची चर्चा.

वादात काँग्रेसकडून भगीरथ भालके शरद पवार गटाकडून अनिल सावंत यांनी उमेदवारी कायम ठेवली प्रणिती शिंदे आणि  शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते  पाटील यांच्या समर्थकांनी प्रतिष्ठेची केली आहे.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *