“साहित्य विहार साहित्य समुहाच्या” चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुरेल गायनाचा एक श्रवणीय कार्यक्रम “मंगलप्रभात” आज सकाळी 10.00 वाजता, समुहाच्या अध्यक्षा, “महाराष्ट्राच्या प्रथम मराठी गझल गायिका” आशाताई पांडेच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला ! त्यात मी रचलेल्या गणेश वंदनेचे गायन आकाशवाणी नागपूर चे ‘अ’ दर्जाचे गायक श्री. जीतेंद्र पटवर्धन ह्यांनी सादर केले. ह्या गाण्याला संगीत दिले आहे सुप्रसिद्ध जेष्ठ संगीतकार श्री. अशोक गोकर्ण ह्यांनी ! हार्मोनियम वर साथही त्यांनीच केली.
सोबतीला व्हायोलीनवर श्री निशिकांत देशमुख, तबल्यावर श्री दिपक भोजराज, तालवादक श्री जयंत उपगडे, मंचकावर गायिकांमधे सांदिपणी शाळा नागपूर च्या संगीत शिक्षिका सिमा झाडे, केतकी देव, श्र्वेता नानोटी उपस्थित होत्या. नेटकं सुत्रसंचलन सौ. अंजली गोकर्ण ह्यांनी केलं. दिड दोन तासाच्या ह्या अप्रतिम कार्यक्रमात अनेक सुमधूर गाण्यांचा मनसोक्त आनंद उपभोगता आला ! होय आज रविवार ची सकाळ सार्थकी लागली.
आनंद शेअर करण्याचा मोह झाला…
आणि सोबतीला व्हिडिओ टाकावासा वाटला !
विकास गजापूरे
9209812148