शिंदे – अजितदादा गटाला कमी मते मिळूनही सर्वाधिक आमदार कसे?; शरद पवारांचा सवाल

मुंबई, दि. ७ : विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएमसह निवडणूक यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवारांनी(sharad-pawar) मतांची आकडेवारी सादर करत सत्ताधारी पक्षांच्या जागा कश्या वाढल्या असा सवाल केला आहे.

माध्यमांशी बोलताना पवार यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असते. पण यावेळी मला महाराष्ट्रात तसे वातावरण दिसत नाही. उगीच आरोप करणे योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही. मात्र प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मते किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात ८० लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे ५७ लोक निवडून आले. म्हणजे ८० लाख वाल्यांचे १५ आणि ७९ लाख वाल्यांचे ५७. शरद पवार गटाचे ७२ लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले १०. अजित पवार गटाचे ५८ लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले ४१. ७२ लाखांचे १० आणि ५८ लाखवाल्यांचे ४१. हे काही तरी गडबड आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, आज मी विधानसभेतून थोडी माहिती घेतली, त्यांचे म्हणंणे होते की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आताच कशी करता? पण आमचं निरीक्षण असं आहे की, चार निवडणुका झाला. हरियाणात झाली. मी स्वत: तीथे गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था कठिण होती. पण भाजप सत्तेवर आली. पण त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला आले. महाराष्ट्रात भाजपला यश आलं. त्याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ छोटी राज्य तीथे आम्ही आणि जिथे मोठी राज्य तिथे भाजप असं दिसतं, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटले आहे.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *