नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरात लवकर केंव्हाही होवू शकते अशी माहिती हिवाळी अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी दिली. राज्याच्या ग्रामिण आणि मागास भागांचा सर्वागिण विकास हे सरकारचे लक्ष्य राहिल असे ते म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोणत्याही परिस्थतीमुळे बिघडू देणार नसून बीड आणि परभणी येथील प्रकरणात दोषी कुणीही असतील त्यांची गय करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला अजीत पवार(ajit-pawar) गैरहजर राहिल्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांकडून खुलासा करण्यात आला की बीड सरपंच हत्या प्रकरणात पिडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पवार गेले आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अन्य कुणी मंत्री देखील यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे पवारगटाच्या राष्ट्रवादीत काही गडबड असल्याची चर्चा विधानभवन परिसरात होती.
मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात बीड जिल्ह्यात कृषीमंत्र्याच्या बोगस पीकविमा प्रकरणात केलेल्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रश्न धसाला लावण्याचे आश्वासन दिले. मात्र पत्रकार परिषदेत त्यांच्या आधी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधकांकडून योग्य पध्दतीने जनतेच्या प्रश्नांची मांडणीच करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. शिंदे यांनी उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) केवळ आमदारकी वाचविण्यासाठी १ दिवस प्रत्येक अधिवेशनात येतात तसे पर्यटनाला येवून गेल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पदासोबत आमदारकी देखील ते सोडणार होते मात्र अजूनही राजीनामा देत नसल्याचे शिंदे म्हणाले. राज्यातील जनतेच्या प्रश्नाना योग्य तो न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीरपणाने उभे राहू असे ते महणाले.