महाराष्ट्रातील भाजपाच्या अभूतपूर्व विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाच्या केंद्रीय कार्यशाळेला नवी दिल्ली येथे केंद्रीय कार्यालयात सुरूवात झाली.

राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील अभूतपूर्व यशाबद्दल बावनकुळे यांचा सत्कार करून अभिनंदन आणि कौतुक केले.

देशभरातील सर्व राज्यांच्या प्रदेश अध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटांन मंत्री व प्रमुख पदाधिकारी व केंद्रीय पदाधिकारी यांच्यावतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत असल्याचे शब्द राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी उच्चारले.

सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, आजचा हा क्षण माझ्यासाठी अभिमानाचा तर आहेच आहे, पण पार्टीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारा, पार्टी नेतृत्वाने दिलेल्या दायित्वाची पूर्णतः करणारा तसेच फलश्रुती असलेला आहे, अशी भावना व्यक्त करून आजचा सत्काराचा क्षण मी माझ्या मनात जपून ठेवत आहे. हा सन्मान मी माझ्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अभियानाची माहिती देवून नियोजनाची मांडणी केली.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *