नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू!

मुंबई  : जवळपास ४५ वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला डावलले जात असल्याची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळे नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेवून उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणाऱ्ये खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणाऱ्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचे म्हटले जात आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणे हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे आहे. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती असल्याचे कळत आहे.

Social Media