मुंबई : विक्की कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट (Chhava Movie)सध्या थिएटरमध्ये धूमाकुळ घालत आहे. ‘छावा’ ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. विक्की कौशल(Vicky Kaushal) आणि रशिका मंदाना(Rashika Mandana)ने पहिल्या तीन दिवसांतच खूप प्रेम मिळाल्याचे पाहिले आहे. या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि प्रेक्षकही चित्रपटा बघून भावूक झाले आहेत. छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर अहिल्यानगरच्या स्त्रिया भावनिक झाल्या. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान उध्वस्त होऊ नये, असे स्त्रियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
छावा चित्रपट पाहायला आलेल्या अहिलनगरच्या महिलांनी पारंपरिक पोशाख घातला होता. छत्रपती संभाजी महाराज की जय, म्हणत त्यांनी चित्रपटगृहात प्रवेश केला. चित्रपट पाहताना महिलांच्या डोळ्यात खरोखर पाणी होते.
छावा हा चित्रपट पाहिल्यानंतर त्या महिलांनी सांगितले, “हा चित्रपट पाहून आम्ही खूप उत्साही होतो.” हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही पारंपारिक ड्रेस घातला होता. जेव्हा आम्ही थिएटरमध्ये आलो तेव्हा आम्ही सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज की जयअशा गर्जना दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूर मार्गाने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांनी आमच्यासाठी बरेच काही केले. छत्रपती यांनी आमच्यासाठी इतका मोठा त्याग केला. त्या बलिदानास तरुण पिढीने व्यर्थ जावू देवू नये. आपण आपला हिंदू धर्म राखला पाहिजे असे सांगताना त्यांचे डोळे पाणावलेले दिसले.
तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला
विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने तीन दिवसांतच शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या तीन दिवसांत विक्की कौशल आणि राशिका मंदाना यांना भरभरून प्रेम मिळालं आहे. विकीच्या कारकीर्दीतील सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांच्या यादीत ‘छावा’ तिसर्या क्रमांकावर आहे.