छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना नामांकन !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 12 गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ
पॅरिसला दाखल झाले आहे. आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा(Vishal Sharma) यांना शिष्टमंडळ भेटले. महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे. असे मंत्री आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी म्हटले आहे.

त्यावर पूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही एँड शेलार यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन(Shikha Jain) उपस्थित होत्या.

हेही वाचा- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून मुंबईत ; 10 मार्च रोजी अर्थसंकल्प

मंकी बात…

Social Media

One thought on “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्यांना नामांकन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *