मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को(UNESCO)चा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पॅरिसला रवाना झाले आहे.
कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना वारसिक दर्जा मिळावा यासाठी शिवप्रेमी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे आता गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
या किल्ल्यांमध्ये रायगड(Rayagad), राजगड(Rajgarh), प्रतापगड(Pratapgarh), पन्हाळा(Panhala), शिवनेरी(Shivneri), लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला(Khanderi Fort) आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला(Jinji Fort) यांचा समावेश आहे.
भारतात आहेत मुगलांच्या ‘या’ ७ सुंदर इमारती, कितीही बघितलं तरी मन भरत नाहीत