कोणतेही वॉर नसून आम्ही सर्व जण कोल्ड आहोत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधकांशी आम्ही लढू शकतो माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांमुळे आम्ही माध्यमांशी लढू शकत नाही. त्यामुळे येथे कोणतेही वॉर नसून आम्ही सर्व जण कोल्ड आहोत असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केला आहे. अनेकदा राज्यातील सरकार बाबत खातरजमा न करताच चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत आणि अश्या बातम्या मुळे आमच्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत असेही उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या सामना मधील लेखाबद्दल शिंदे आणि पवार यांनी खुलासा केला. पहाटे भेट झाली नसून सकाळी दहा वाजता भेट झाली त्यावेळी तीनही नेते उपस्थित होते. असे या नेत्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर बहिष्कार करून विरोधकांनी सरकारसोबत जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर संवादाची संधी गमावली आहे, अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले आहे. फ्रान्सच्या कंपनीशी केलेल्या कराराबाबत विरोधकांनी भ्रष्टाचाराबाबत न केलेल्या आरोपांवर चुकीच्या बातम्या प्रसारीत केल्या गेल्या असल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केला. अधिवेशनात पाच महत्वाची विधेयके प्रस्तावित असून अर्थसंकल्प अभिभाषण आणि महत्वाच्या चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची पूर्ण संधी देवून त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यास महायुती सरकार सज्ज असल्याचे ते म्हणाले.

Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *