एनसीबीकडून श्रद्धा कपूरची चौकशी… शक्ती कपूर साकारणार सुशांतच्या चित्रपटात एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका 

मुंबई :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. आणखी एकाअभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणातील अनेक चित्रपट अभिनेत्रींवर एनसीबीने चौकशी केली आहे. दुसरीकडे चित्रपट निर्माते सुशांतसिंह राजपूत यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी करत आहेत. शनिवारी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी केली गेली, यांचे नाव  ड्रग्स प्रकरणात  समोर आले आहे.

श्रद्धा कपूर एनसीबी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना सामोरे जात असताना अभिनेत्री श्रद्धाचे वडील शक्ती कपूर सुशांतसिंह राजपूत यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका मिळाली आहे. असे सांगितले जात आहे की सुशांतसिंह राजपूतच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार होणार आहे, त्यात शक्ती कपूर एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकतील.

‘न्याय : द जस्टिस’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणाऱ्या झुबैर खानने सांगितले  की,’ अमन वर्मा ईडी ऑफिसरची भूमिका साकारत आहेत, शक्ती सर नार्कोटिक्स ऑफिसरची भूमिका आणि सुधा चंद्रन जी सीबीआय अधिकारी म्हणून भूमिका साकारत आहेत.  सुशांतसिंह राजपूत यांच्या प्रभावी भूमिकेत झुबेर महेंद्रसिंहची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर रिया चक्रवर्तीची व्यक्तिरेखा उर्वशी म्हणून दाखवण्यात येईल आणि उर्वशीची भूमिका श्रेया शुक्ला साकारणार आहे. जुबेर के खानच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची कास्ट जवळजवळ पूर्ण झाली आहे. यामध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, अंकिता लोखंडे, कृती सॅनन, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती आणि अभिनेता व्यवस्थापक दिशा सालिआन यांच्याही भूमिका दाखवल्या जातील.

शनिवारी सारा आणि श्रद्धाची पाच तासापेक्षा अधिक वेळ चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. श्रद्धाने सुशांतबरोबर पार्टीत भाग घेण्याचे कबूल केले आहे आणि पवना येथे झालेल्या पार्टीत मद्यपानही  केल्याचे तिने कबूल केले आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप त्यांनी नाकारला आहे.

Social Media