विधानसभा समालोचन दि. ७ मार्च

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भरगच्च कामकाज पत्रिका होती. त्यात लक्षवेधी प्रश्नोत्तरे या शिवाय राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावा वरील चर्चेला मुख्यमंत्र्यानी दिलेले उत्तर, पुरवणी मागण्या आणि चर्चारोध, तसेच महिला दिना निमित्त अध्यक्षांचा विशेष चर्चेचा प्रस्ताव असे महत्वाचे कामकाज हेच आजच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल.

सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. यावेळी डॉ तानाजी सावंत आणि अन्य सदस्यांचा राज्यातील होर्डिंग्जचे लेखा परिक्षण करण्याबाबतचा प्रश्न गाजला. या प्रश्नावर सुमारे अर्धातास सभागृहात चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी बोलताना प्रभारी नगरविकासमंत्री उदय सावंत यांनी घाटकोपर येथे दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच नागरी भागातील होर्डिंग बाबत सर्वेक्षण करून बेकायदा होर्डिंगवर कारवाईची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर लाखौ होर्डिंगवर कारवाई करण्यात आल्याचे ते म्हणाले. या प्रश्नावर अनेक सदस्यांनी अजुनही अनेक भागात बेकायदा होर्डिंग लावली गेली असून त्यामुळे रस्ते अपघात होत असल्याबाबत लक्ष वेधले. त्यावर माहिती घेवून कारवाई करण्याचे आश्वासन मंत्री सामंत यानी दिले.

मुंबई नाशिक महामार्गावर वडपे ते ठाणे दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत सुनिल प्रभू आणि अन्य सदस्यांचा तारांकीत प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादाजी भुसे यानी या महामार्गावर राज्यातील सर्वाधिक वाहतूकीचा भार असल्याचे सांगितले. व्हिजेटीआय मार्फत या रस्त्याच्या कामाचे लेखा परिक्षण केले जात असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदाराकडून काही कसूर केली असल्याचे दिसून आल्यास कारवाई केली जाईल असे भुसे म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला पूर्वी दहा ते बारा प्रश्नाची चर्चा होत असे मात्र आता त्यात तीनचार प्रश्नच चर्चेला येत असल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे स्कोपच्या बाहेरच्या प्रश्नावर चर्चा न करता जास्तीत जास्त प्रश्नाना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन तालिका अध्यक्ष संजय केळकर यानी दिले.

त्यानंतर अंधेरी येथील स्कायपँन या इमारतीला आग लागल्याबाबत अमित साटम आणि अन्य सदस्यांचा प्रश्न होता. त्यावर यावेळी प्राभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यानी सन २०२३ पाून पाच हजार ७४ आणि सन २०२४ मध्ये सुमारे पाच हजार ३०१ आगीच्या लहान मोठ्या घटना झाल्याची माहिती दिली.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्यात आली त्यात राज्याच्या सन २०२४-२५ या वर्षाचा अर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचा सन २०२१-२२ आणि २०२२- २३ या वर्षाचे वित्तीय अहवाल सादर करण्यात आले.

प्रश्नोत्तरा नंतर विरोधी पक्षांकडून स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज पुरवणी मागण्या असल्याने फेटाळण्यात आल्याचे तालिका अध्यक्ष केळकर यानी सांगितले. त्यावेळी जयंत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तरी त्या विषयावर सभागृहाला अवगत का केले नाही असा सवाल केला. त्यावर  तालिका अध्यक्षांनी त्याबाबत सभागृहात घोषणा करण्याची प्रथा नसल्याचे सांगितले. त्यावर नाना पटोले यानी हरकत घेतली. या सभागृहात चुकीची माहिती दिली जात असल्याचे ते म्हणाले. अनेक वर्षापासून सभागृहात माहिती दिल्यानंतर ती माध्यमांसमोर देण्याची प्रथा  असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर माहिती तपासून घेवून त्यावर निर्णय देण्याची घोषणा तलिका  अध्यक्षांनी केली.

परतूर येथे महिला तहसील दार यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला असून त्यांच्याबाबत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी ब बनराव लोणीकर यानी केली. त्यावर आजचे कामकाज संपण्यापूर्वी निवेदन करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी दिले.

त्यानंतर लक्षवेधी सूचनांचे कामकाज पुकारण्यात आले. या कामकाजातील एकूण ३ लक्षवेधी सूचना नंतर पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा पिटासीन अधिका-यांनी केली. या लक्षवेधी सूचनामध्ये भिवंडीची लोकसंख्या १७ लाखाच्या वर गेली असल्याने आणि अधिक लोकसंख्या वाढत असल्याने शहरात रस्ता वाहतुकीचा प्रश्न कठीण होत असल्याचा मुद्दा रईस शेख यानी मांडला त्यावर प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यानी मंत्रीस्तरावर बैठक घेवून उपाय योजनांवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

डॉ राहूल पाटील यानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्ताने परभणी शहरात पुतळा उभारण्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर नगरविकास विभागाचे प्रभारी मंत्री उदय सामंत यानी जिल्हा विकास निधी तसेच नगरविकास विभागाच्या मार्फत याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पुणे पिंपरी चिंचवड शहरात होणा-या नदीच्या पर्यावरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना करुन प्रदुषणाला कारणीभूत घटकांचा अभ्यास करण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यानी सांगितले.

लक्षवेधी नंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्याकडून उत्तर देण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बारा शिवकालीन किल्ले जागतिक वारसा केंद्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शंभर दिवसांचा कार्यक्रम सध्या सुरू असून त्यात १५ एप्रिल नंतर मुल्यांकन केले जाणार असून चांगली कामगिरी करणा-या विभागाना १ मे रोजी गौरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याकडून शिंदे यांच्या काळातील योजनाना स्थगिती दिल्याच्या बातम्या माध्यमातून दिल्या जात असल्याचे सांगताना ते म्हणाले की आम्ही तिघांनी पूर्वी एकत्रितपणे निर्णय घेतले असल्याने त्यात बदल करण्याबाबत आम्ही तिघे चर्चा करुनच निर्णय घेत असतोि मात्र माध्यमातून याबाबत चुकीच्या दर्जाहिन बातम्या दिल्या जात आहेत असे ते म्हणाले. योजनाना स्घगिती देण्याबाबत आपण उध्दव ठाकरे नाही असा राजकीय टोला त्यानी लगावला. राज्यात विक्रमी सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की त्या नंतर तूर खरदेी देखील विक्रमी केली जात आहे. राज्यात वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्प केला जात असून त्यामुळे विदर्भाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. त्या प्रमाणेच उल्हास खो-यातील पाणी मराठवाड्यात आणि कोकणातील कोयनेचे पाणी देखील वाया जात असल्याने ते मराठवाड्याला देण्याबाबत योजनेवर सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

राज्यात ४५ लाख कृषीपंपाना मोफत वीज दिली जात असून येत्या पाच वर्षात टप्याटप्याने वीज दर कपात केली जाणार आहे असे ते म्हणाले. येत्या २०३० वर्षापर्यंत राज्यात ५२ ट्क्के वीज हरित ऊर्जा स्त्रोतातून दिली जाणार आहे त्यामुळे वीजेसाठी देण्यात येणा-या अनुदानात मोठी कपात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. राज्यात मागेल त्याला सौर पंप योजना यश स्वी झाल्याचे ते म्हणाले.

मुबंई महानगर क्षेत्रातील मेट्रोच्या प्रकल्पातील बहुसंख्य कामे प्रगतीपथावर असून सन २०२७ पर्यंत सर्व मेट्रो प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात शक्तीपिठ महामार्गाचा आराखडा तयार केला जात असून हा महामार्ग झाल्यास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमँप असेल असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्याच्या अभिभाषणावरील उत्तरानंतर पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानाचे कामकाज घेण्यात आले दुपारी चार वाजता चर्चारोध असल्याने गृह आणि नगरविकास विभागाच्या  मागण्यांवरील चर्चा पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजीत पवार यानी चर्चेला ऊत्तर दिल्यानंतर मतदान घेण्यात आले. मागण्या मंजूर झाल्यानंतर महिला दिना निमित्त अध्यक्षांचा महिला दिना निमित्त विशेष प्रस्ताव चर्चेला पुकारण्यात आला. यावेळी महिलांच्या विकासाबाबत मनिषा चौधरी, लता सोनवणे, श्वेता महाले सरोज अहिरे सुलभा खोडके. इत्यादी महिला सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना महिला दिनांच्या विशेष प्रस्तावाची चर्चा सुरू होती.

किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)
Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *