फेसबुक ‘चॅलेंज’ वर बोलू काही….

एवढ्यात फेसबुक वर 【चॅलेंज】आईच्या भाषेत या”आव्हान” …. हा शब्द खूप प्रचलित झाला. आणि पती-पत्नी, वडील-मुलगी/मुलगा, आई-लेक, जुळे भाऊ बहीण, असं खूप छान फोटो पहायला मिळाले. कित्तेक मित्रांनी पक्षी प्राणी यांच्या सुद्धा सुंदर फोटो शेयर केल्या आणि लगेच काही मित्रांनी जोग केला. मैत्रीण चा फोटो आणि स्वतः चा फोटो ठेवा आणि बायकोला टॅग करा. तो मोठा चॅलेंज.

या सर्व वातावरणाला सकारात्मक घेऊया. होऊ शकते या निमित्ताने आठवणी जाग्या झाल्या. तिने छान साडी, ड्रेस घातला आणि त्याने सुध्दा सुंदर कपडे घातले. दोघांनाही सजायची इच्छा झाली. कोरोना परिस्थिती त्यात हे चॅलेंज खरंच छान आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं झालं. फेसबुक वर मित्रांशी गप्पा झाल्या आणि ती आणि तो मिरवायला लागले. मन खूप खुश झाले.

काही मित्रांनी नकारात्मक बोलून सर्वांना थोडं नाराज केलं. तर दुसऱ्यांच्या बायका पाहण्यासाठी हा चॅलेंज होता असे शब्द वापरले. असं का यावर चर्चा नको. तिला आणि त्याला ते आनंदाचे क्षण मिळाले हे महत्त्वाचे आहे. आज पेपर ला न्यूज पाहिली आणि या आनंदाच्या क्षणात फेसबुक वरील भामटे लोक, हॅकर्स लोक या आपल्या आयुष्यातील आनंदात भुरळ पाळली. हे 100 टक्के खरं आहे मित्रांनो.

आमच्या यशदामधील सायबर सिक्यूरिटीचे मार्गदर्शन यांनी प्रात्यक्षिक करून असे गंभीर प्रकार सांगितले तेव्हा कळलं सोशल मीडिया चा वापर चांगल्या तेवढ्या वाईट कामासाठी होत आहे आणि होत राहील. म्हणून आपण मित्रांशी बोलायचं नाही का? काही शेयर करायचं नाही का? असे अनेक प्रश्न मनात येतात.

कारण सोशल मीडिया हा स्वतःला व्यक्त होण्यासाठी खूप छान मार्ग आहे. आपण कित्येक मित्रांशी कनेक्ट असतो. कित्येक वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती समोर येते. स्वयंपाक करण्यापासून ते अगदी खात पर्यंत मित्र परिवार तोंडाला पाणी सोडवत असतात. कुठे काही वाईट घडलं तर फोटो शेयर करून भावना व्यक्त करतात. त्याला आपण दुजारा देतो. कधी कधी तर मार्गदर्शन सुद्धा घेतात आणि आपले मित्र व्यवस्थित पर्याय देतात. कित्येक मित्रांच्या कलेला वाव मिळतं आणि वाढदिवस साजरे होऊन शुभेच्छा व आशीर्वाद मिळतो.

मित्रांनो सोशल मीडिया वाईट नाही फक्त याचा वापर करणारे विचित्र लोकांपासून सावध राहूया आणि सुरक्षित सेटिंग करून ठेऊ. 15 दिवसांनी पासवर्ड बदलवत राहू. आणि you tube वर बऱ्याच अनुभवी लोकांनी सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे ते पाहूया.

मित्रांनो आणखी खूप चॅलेंज आहेत. आपल्या आयुष्यात त्याकडे सुद्धा लक्ष देऊया बरेच मित्र खूप छान काम करत आहेत. वैयक्तिक चॅलेंज सोबत थोडे सामाजिक चॅलेंज स्वीकारूया.

चॅलेंज 【आव्हान】आहे…………

√ दुष्काळ भागात जमिनीची धूप कशी वाढू शकते.?
√ पावसाचं पाणी जमिनीत कसं मुरवू शकतो.?
√ बालकामगार मुलांना शाळेचा मार्ग कसा दाखवू शकतो?
√ झाड तोडण्यापासून कसं वाचवू शकतो आणि झाडं कुठे आणि किती लावू शकतो.?
√ महिलांना विविध अत्याचार विषयी सतर्क कसं करू शकतो.?
√ गरीबी पासून लोकांना दूर कसं करू शकतो?
√ आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा समाजाला काय उपयोग होऊ शकतो.?
√ किशोरवयीन आणि इतर मुलींना जनावर वृत्तीच्या पुरुषांपासून दूर कसं ठेऊ शकतो?
√ तरुण बेरोजगार मुलांना व्यवसायिक मार्गदर्शन कसं करू शकतो.
√ वृद्ध लोकांना आपुलकी च्या वातावरण कसं देऊ शकतो.
√ रस्त्यावर राहणारे बेघर लोकांना काम कसं देऊ शकतो.

आणि खूप काही चॅलेंज आहेत जे आपण वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वीकारू शकतो.

आपण एक चॅलेंज ही पूर्ण केलं तरी जीवनाचं सार्थक झालं…….

स्वीकारूया मित्रांनो चॅलेंज…. 【आव्हान】

दिवाळी सारखा सण समोर येत आहे कोरोना महामारी मध्ये कित्तेक गरीब मित्र रस्त्यावर आले चला 【”ओंजळ मानवतेची”】 उपक्रम स्वीकारूया आणि शक्य तोवर दिवाळी यांच्या संगती साजरी करूया…. दिवे लावू, फराळ करू, कपडे देऊ ……आता ओळखुया आपण कोणते चॅलेंज पूर्ण करू शकतो. जास्तीत जास्त मित्रांना शेयर करूया आणि चॅलेंज चे फोटो शेयर करून आपला अनुभव सांगूया. चर्चा करूया . मित्रांनो…..कपल चॅलेंज प्रमाणे हा चॅलेंज थोडा मोठा आहे पण नक्कीच मानसिक सुख मिळेल.

फक्त याला वैयक्तिक स्वरूप न देता सार्वजनिक स्वरूप देऊ……एक व्यक्ती एक चॅलेंज म्हणजे कित्येक चॅलेंज पूर्ण होऊ शकतात…. हा विचार खूप मोठा होईल मित्रांनो. आव्हान स्वीकारण्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.

 

अर्चना वत्सला गिरीधर मोरे
संस्थापिक”आसरा सोशल फौंडेशन”.. पोषण, रक्षण आणि शिक्षण फक्त मानवतेची ओंजळ

महा. रजिस्ट्रेशन नंबर-७२७ महाराष्ट्र राज्य.

Social Media