राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळीने बाधित; कृषिमंत्र्यांकडून पाहणी
नंदुरबार : गेल्या चार-पाच दिवसांत महाराष्ट्रभर झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांमधील १०३ तालुके अतिवृष्टी व गारपिटीच्या तडाख्यात सापडले आहेत. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हजारो एकरांवरील कांद्याच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केल्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे(Adv. Manikrao Kokate) यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषिमंत्री ॲड. कोकाटे(Minister of AgricultureAdv. Manikrao Kokate) म्हणाले की, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत, काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्यासमोर येईल. हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या