दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी
मुंबई : शासनाची फसवणूक करणाऱ्या कोणाचीही हयगय करणार नाही. रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून याप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.
ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भुयारी गटार योजनेच्या ठेकेदारांनी मातीची बेकायदेशीर वाहतूक करून रॉयल्टी बुडविल्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेसाठी नेमलेले कंत्राटदार आनंद कंस्ट्रवेल यांनी मातीचे उत्खनन करून पुन्हा भरणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीची रॉयल्टी न भरता तसेच परवानगी न घेता मातीची बेकायदेशीर वाहतूक केली होती. या ठेकेदाराने सुमारे ४,६५२ ब्रास मातीच्या वाहतुकीपोटी ४ कोटी ८३ लाख ८० हजार ८०० रुपये स्वामीत्व धन (रॉयल्टी) बुडविल्याचेही निदर्शनास आले होते. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका हद्दीतील मौजे कोपरीगाव येथे ठेकेदार मे.एन.सी.सी. व एस.एम.सी. यांनी बांधकाम करण्यासाठी मातीचा भराव केला असून हजारो ब्रास स्वामित्व धन (रॉयल्टी) बुडविली आहे. याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
अधिकाऱ्यांना धारेवर धरले
रॉयल्टी बुडवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात झालेल्या दिरंगाईबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सन २०१८ पासून शासकीय अधिकाऱ्यांना या विषयाची माहिती असतानाही कारवाईसाठी विलंब का झाला असाही सवाल मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत विचारला. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाज करणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले. संबंधित ठेकेदारांकडून तातडीने दंडाची रक्कम वसुल करण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत दिले.
There will be no leniency towards anyone defrauding the government. Revenue Minister Bawankule has ordered departmental inquiries against officials delaying action and directed that criminal charges be filed against contractors evading royalty payments.
बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पोलीसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे उच्चन्यायालयाचे आदेश!