मुंबई : व्हिएतनाममधील अन्नविषयक मागणीतील विविधता, बदलती आहारपद्धती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार या गोष्टी महाराष्ट्रातील कृषीमाल निर्यातदारांसाठी संधी निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
इंडो-व्हिएतनाम चेंबर्सचे अध्यक्ष अजय रुईया आणि व्हिएतनामचे महावाणिज्यदूत बियेन क्वांग ले यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र व व्हिएतनाम मिळून कृषी, औषधी, स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, ऑईल अँड गॅस आदी विविध क्षेत्रात व्यापाराची मोठी संधी आहे. या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यात येईल. व्हिएतनाममधील प्रांतांसोबत सहकार्याचे संबंध बळकट केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आणि एकूणच भारताच्या तुलनेत बांगलादेश, चीन, व्हिएतनाम आदी देशांमध्ये कापूस उत्पादन आणि संबंधित व्यापार वाढत आहे. त्या तुलनेत भारत देश मागे पडत आहे. येथे वापरले जाणारे बियाणे आणि तंत्रज्ञान जुने असून त्यामध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याचे मत या क्षेत्रातील व्यापारी कुश उदेशी यांनी यावेळी व्यक्त केले, या अनुषंगाने महाराष्ट्रात येत्या काळात बियाणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मंत्री रावल यांनी केले.
Vietnam’s diverse food demand, evolving dietary habits, and expanding food processing industry present significant opportunities for Maharashtra’s agricultural exporters. Minister of Protocol and Marketing, Jaykumar Rawal, emphasized that these factors could open new avenues for trade and investment between Maharashtra and Vietnam.
Vietnam’s food industry has been growing rapidly, with a $73.8 billion market and a strong demand for processed food ingredients. Additionally, the country is experiencing a nutrition transition, with changing food supply trends and increasing consumption of meat, dairy, and processed foods. The affordability of healthy diets remains a challenge, particularly for low-income households.
Maharashtra’s exporters could benefit from these shifts by supplying high-quality agricultural products that align with Vietnam’s evolving food preferences. Would you like insights on specific export strategies or trade policies?